ग्रामिण भागातील शैक्षणीक गुणवत्ता व दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहाणार : आदीती तटकरे

ग्रामिण भागातील शैक्षणीक गुणवत्ता व दर्जा उंचावण्यासाठी माझ्यासह सर्व युवा आमदार प्रयत्नशील रहाणार : आदीती तटकरे

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी

वैज्ञानिक व स्पर्धेच्या युगात शिक्षणावर विशेष लक्ष देणे
आवश्यक आहे.शहरी भागातील शिक्षणाचा दर्जा पहाता आता ग्रामीण भागातील शिक्षण दर्जेदार झाले आहे, प्रशासनाकडून या मध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक त्यासेवा सुविधांची गरज आहे. र०१९ च्या विधान सभेत तरुण विधानसभा सदस्यांची संख्या व आभ्यास पहात समग्र शिक्षण अभियान अंतर्गत आमचा सर्वांचा प्राधान्यक्रम ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी असेल असे मत श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व शाळेचे चेअरमन समीर बनकर, जिप सदस्य बबन मनवे,सभापती छाया म्हात्रे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, उपसभापती संदीप चाचले,माजी सभापती उज्वला सावंत,प.स.सदस्य मधुकर गायकर,रेश्मा कानसे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,शिक्षण अधिकारी संतोष शेडगे,प्राचार्य के.एल.जाधव,अभियंता गांगुर्डे, अशोक कोकरे, अंकुश खडस,श्रीपतराव धोकटे,महादेव पाटील,सतीश शिगवण
नितीन बोरकर,मंगेश कदम,अनिल बसवत,नाना सावंत,मुन्ना पानसरे,शालेय विध्यार्थी,शिक्षक संघटनेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेज म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरावर तीन दिवस विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उदघाटक आमदार आदिती तटकरे यांचे हस्ते म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य संगणकीय अटल लॅब (प्रयोग शाळा)चे उदघाटन केले तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी भाभा अणुकेंद्रात कार्यरत असलेले वैज्ञानिक कपिल शिंदे,नासा मध्ये कार्यरत असलेले वैज्ञानिक प्रणित पाटील,शिक्षण क्षेत्रातील संतोष बागडे आणि शाळेचा कराटे बहादूर विद्यार्थीआदित्य कळमकर यांचा सत्कार करण्यात आला.आमदार तटकरे यांनी आयोजीत सुंदर आणि नीटनेटक्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे कौतुक करताना म्हसळा तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात साकारलेल्या मॉडेल्स वरून ते अत्यंत हुशार आणि गुणवान आहेत या कामी अधिकारी आणि शिक्षक यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.येथील सर्वच मॉडेल उत्कृष्ट आणि बक्षीस पात्र आसुन ते जिल्हा स्तरावर निवड करण्याचे पात्रतेचे असल्याचे नमुद केले.मुलांची अभ्यास करून भविष्य घडविण्यासाठी क्षमता असेल तर ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही उच्चपदस्थानी जाऊ शकतात. पालकांनी मुलांना त्यांच्या आकलनशक्ती नुसार त्यांचे भवितव्य घडवू देत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्राधान्य द्यावे असे सुचित करतानाच शाळेतील संबंधितांनी शालेय पोषण आहारात काळजी पुर्वक काम पहावे त्यात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचा सुचक इशारा आमदार आदिती तटकरे यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा