कोकणात ओला दुष्काळ जाहीर करा खासदार सुनील तटकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
कोकणात नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील काही भागांत परतीचा पाऊस आणि गारपीट झाल्याने रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील शेतक-यांचे हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे उभी पिके आडवी झाली असून पिकांची नासाडी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. शासनाने याबाबतीत पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नसून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम बघितल्यास या दोन्ही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून कोकणातील शेतक-यांना तात्काळ मदत जाहीर करावी. अशी मागणी खा. सुनील तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा