ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भारपाई देण्यात यावी : कुणबी समाजोन्नती संघ मुरुड

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
परतिच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या झालेल्या नुकसानी बाबत आज दिनांक ३१/१०/२०१९ कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई शाखा तालुका -मुरूड-जंजिरा(शहर/ग्रामीण) संयुक्त विद्यमाने तहसीलदार कार्यालय आणि कृषी अधिकारी मुरूड तालुका येथे जाऊन निवेदन देण्यात आले. कोकण विभागात ओला दुष्काळ जाहीर करून सदर शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भारपाई देण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी  शहर अध्यक्ष किरण डिके,अध्यक्ष ग्रामीण सुरेश ठाकूर,शहर उपाध्यक्ष अशोक बामुगडे, उपाध्यक्ष अविनाश गायकर,ग्रामीण सहसचिव रुपेश बांद्रे, ग्रामीण ग्रामीण सह खजिनदार निलेश खामकर,हरिश्चंद्र कांगणे,शहर खजिनदार प्रमोद वणे, शहर सचिव भावेश भुवड,शशीकांत बांद्रे,कुणबी युवा सचिव मनोज डिके, बाळाराम डिके,जनार्दन मांजरेकर,हरिश्चंद्र घवाली,पांडुरंग घवाली,किरण मोरे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा