भगव्या वादळासोबत ,शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल : युतीच्या घट्ट पक्कडीने शिवसैनीकांचे वाढले बळ


फोटो--१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून शिसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतेसमई शक्ती प्रदर्शन करताना विनोद घोसाळकर व मान्यवर


संजय खांबेटे : म्हसळा 

१९३ श्रीवर्धन मतदार संघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार कोकण म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आज गुरुवारी शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्या समवेत आम.भरतशेठ गोगावले, माजी आमदार अवधूत तटकरे,भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कृष्णा कोबनाक,माजी आमदार तुकाराम सुर्वे,जिल्हा प्रमुख अनिल नवगणे,माजी जिल्हा प्रमुख रवी मुंडे,बाळशेठ लोखंडे, अॅड. राजीव साबळे, मतदारसंघातील सर्व तालुका प्रमुख, विभाग प्रमुख व मोठया प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात व सेनेचे विनोद घोसाळकर यांच्यात थेट लढत होणार आहे. युतीतील भाजप, आर.पी.आय. (आठवले गट ) या वेळी एक संध आहेत त्यामुळे शिवसैनिकांच्यात उत्साह होता तर आघाडीत आजच्या घडीला श्रीवर्धन मतदार संघात काँग्रेसने आघाडीची साथ सोडली असून काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार व म्हसळा तालुका अध्यक्ष डॉ.मुईज शेख यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने राष्ट्रवादीच्या अडचणीत तूर्त वाढ झाली आहे. या उलटयुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना भाजप ने साथ दिल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तर मतदारसंघातील विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये गेलेल्या जुन्या शिवसैनीकानी पुन्हा शिवबंधन बांधल्याने घोसाळकरांचा व शिवसैनीकांचा आत्मविश्वस वाढल्याचे दिसत आहे. घोसाळकर यांनी विजय आपलाच असून ही लढाई घराणेशाही विरुद्ध विकासाची होईल असे सांगितले.माजी आम.अवधूत तातकरे यांनी मी आता बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनीक आहे.विरोधात माझी बहिण असली तरी मी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे काम एकनिष्ठतेने करणार असल्याचे सांगितले.हा मतदार संघ भाजप ला सोडावा म्हणून आग्रही असलेले भाजप चे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक हे देखील विनोद घोसाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपस्थित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैत्यन्य निर्माण झाले..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा