सशक्त ,सुसंस्कृत व चारित्र्यवान विद्यार्थी समाजाच्या विकासाचा कणा आहे ....सुहास यादव
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
शिक्षण हे मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी महत्वाचे साधन आहे .मानवी हक्क व संवर्धनासाठी शिक्षण अगत्याचे आहे .प्रत्येक समाजातील विद्यार्थी शिक्षणा द्वारे सुसंस्कृत ,सुजाण नागरिक तयार होऊन समाजाच्या उद्धार साठी त्या समाजाचा कणा बनतो असे प्रतिपादन प्राध्यापक सुहास यादव यांनी केले .
क्षत्रिय मराठा समाज शिक्षण समिती आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी यादव यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थी वर्गाशी सवांद साधला .आज आधुनिक तंत्रज्ञाना वर आधारित शिक्षण आले आहे .पारंपरिक शिक्षण पद्धती उत्तरोत्तर कालबाह्य ठरत आहे .आपल्या विद्यार्थ्यांनी नाविन्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे .आपणांस स्पर्धेच्या युगात आपले स्थान बळकट करण्यासाठी कष्ट व चिकाटी या दोन्ही बाबींचा उपयोग करून यश मिळवायचे आहे .जो पर्यंत यशस्वी होत नाही तो पर्यंत न थांबता , न थकता मार्गक्रमण करायचे आहे .असे सुहास यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले . सदर प्रसंगी तेजस ठाकूर , कोमल पवार , धनश्री यादव व कविता पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .उपस्थित गुणवंत विदयार्थ्यांना दादासाहेब भोसले ,सुजित तांदळेकर , किशोर राऊत ,नथुराम सावंत व राजू भोसले यांनी संबोधित केले सदरच्या उपक्रमास .पांडुरंग गुजर , प्रदिप राऊत, प्रदिप कदम ,युवा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेलार व सुनील ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील वाकळघर , दांडगूरी , नागलोली , खुजारे , आसुफ , धारवली ,पेंडाबे , खुजारे गावातील 66 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सावंत यांनी केले .


Post a Comment