संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील मौजे बनोटी, वारळ, गोंडघर येथे मा.ना.श्री.रविंद्र चव्हाण साहेब व जिल्हाध्यक्ष मा. श्री.प्रशांत ठाकुर साहेब यांच्या प्रयत्नातुन डोंगरी विकास योजने अंतर्गत सामाजिक सभागृह मंजूर करण्यात आले. या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे प्रमुख कॄष्णा कोबनाक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. सरोज म्हशिलकर जिल्हा चिटणीस, प्रकाश रायकर तालुका सरचिटणीस, तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस, मंगेश म्हशिलकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य, महेश पाटील जिल्हा चिटणीस युवा,शरद चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष, सौ. मिना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, समीर धनसे तालुका अध्यक्ष अल्पसंख्यक मोर्चा, मनोहर जाधव तालुका अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा, अनिल टिंगरे तालुका चिटणीस, राकेश हेलोंडे, गोविंद भायदे, तुकाराम भायदे,जितेंद्र नाक्ती, दिलीप कोबनाक इत्यादि मान्यवर उपस्थित होते.कॄष्णा कोबनाक यानी आपल्या भाषणाचा रोख विरोधकांवर घेत केंद्रात व राज्यता भारतीय जनता पार्टिचे सरकार असून या मतदार संघात जेवढे काम स्थानिक लोकप्रतिनिधिनी केलेनाही तेवढे काम माझ्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून झाले आहे व लवकरच जिल्हा नियोजन फंड व खणिकर्म या योजने अंतगर्त कामे मंजूर होतील असे आश्वासन देत विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष तयार आसल्याची विरोधकाना जाणीव करून दिली.

Post a Comment