संजय खांबेटे : म्हसळा
महिलांच्या आरोग्याची निगा राखणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत देशभरात सहा कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण करण्यात आले. याच अनुषंगाने H.P कडून विभाग निहाय ग्रामिण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या वितरकांचा सन्मान करण्यात आला, सन २०१९ मध्ये वितरण, वितरण पश्चात सेवा व पुरवठा या सर्व सूत्रांत कादीरी एच.पी.गॅस.ग्रामिण वितरकचा पाहिला क्रमांक लागला , प्रोप्रा.सैअद अहमद कादरी यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी एच.पी. गॅस.चे पश्चिम विभागाचे महाप्रबंधक देवाशीष चक्रवर्ती, उप महाप्रबंधक रमाकांत दास,उप महाप्रबंधक नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय विनीत आचार्य व नवी मुंबई सेल्स एरीयातील ९० वितरक उपस्थित होते.पंतप्रधान उज्ज्वला योजनें’तर्गतचे सहा कोटी मोफत घरगुती गॅसजोडणीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण करण्यात आले. देशातील प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पोहोचविण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आले आहे. कादीरी यानी हे काम करताना केवळ व्यवसाय न पहाता राष्ट्रहीत जोपासले या शिवाय त्यानी वितरीत केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ८० टक्के लाभार्थ्यांनी मिळालेल्या सिलिंडरचा पुनर्भरणा केला आहे हे महत्वाचे आसल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment