श्रीवर्धन मधील सुज्ञ जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे - सुनील तटकरे


राष्ट्रवादी काँग्रेस कडून विविध विकास कामांचे भूमिपूजन

श्रीवर्धन प्रतिनिधी  संतोष सापते

श्रीवर्धन मतदार संघातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी गेली दहा वर्षे अखंड परिश्रम करून कोट्यवधी रुपयाचा निधी मिळवण्यात मला यश आले. श्रीवर्धन च्या जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचे वृण व्यक्त करतो. व माझं संपूर्ण आयुष्य जनतेच्या विकासासाठी समर्पित करतो. असे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. श्रीवर्धन नगरपरिषद शाळा 1 मध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. श्रीवर्धन शहर जगाच्या नकाशावर एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे असा माझा मानस आहे. त्यादृष्टीने मी सदैव प्रयत्नशील असुन श्रीवर्धन मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. श्रीवर्धन शहराचं नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहून देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक श्रीवर्धन मध्ये यावेत पर्यटन वृद्धीद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन श्रीवर्धन मधिल प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्मिती व्हावी असे मला वाटते. त्यासाठी श्रीवर्धन शहराच्या सौंदर्यासाठी घरोघरी निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या संकलनासाठी आज आपण दहा हजार डस्टबिन चे वाटप करत आहोत. हे स्वच्छतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे. असे तटकरे यांनी सांगितले. देशात सर्वत्र मोदींचे वारे वाहत असताना रायगडच्या जनतेने विकासाला प्राधान्य दिले. माझ्यावरील दाखवलेला विश्वास मी सदैव सार्थकी लावेन.  आजपर्यंत कोळी समाजाचे असंख्य प्रश्न मी निरंतर सोडवत आलेलो आहे. आगामी काळात उर्वरित प्रश्न निश्चितच निकाली काढीन. असे तटकरे यांनी सांगितले. माझा झालेला विजय हा धर्म निरपेक्ष विचारांचा विजय आहे. आज मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीस विकासाचे महत्त्व समजलेले आहे. आगामी  काळात  विकास हेच माझे व्हिजन असेल त्या मध्ये कुठलाही बदल होणार नाही .आज पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता  जोमाने काम   आहे . त्याची फलश्रुती निश्चितच आगामी काळात निदर्शनांस येईल .जनतेशी असलेली आपली बांधिलकी आपण सर्वांनी सदैव जोपासली आहे .पक्ष वाढीत प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे आहे .असे सुनील तटकरे यांनी सांगितले .सदरच्या कार्यक्रमासाठी प्रभारी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक , तालुका अध्यक्ष दर्शन विचारे , गणेश पोलेकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते .सदरच्या दिवशी श्रीवर्धन शहरातील विविध कामांचे भूमिपूजन सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा