म्हसळा तालुक्यातील वारळ गावातील स्वयंभू दत्ता मंदिराचे झालेल्या नुकसनाची पाहणी करताना सभापती छाया म्हात्रे,तलाठी गोरख माने व ग्रामस्थ
वादळ वार्याचा फटका देवालाही : म्हसळ्यात स्वयंभू देवस्थानाचे वादळवार्यामुळे 3 लाखाचे नुकसान : इतरही दोन ठिकाणी नुकसानाची नोंद
म्हसळा(निकेश कोकचा)
निसर्गाच्या बदलत्या रूपाचा फटका मानवाला वारंवार बसल्याचे आपण ऐकत आलो आहे.पण यावेळी वादळवार्याचा फटका चक्क देवालाच बसला आहे.म्हसळा तालुक्यातील एका स्वयंभू देवस्थानाला सोसाट्याच्या वादळवार्यामुळे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.यासोबत इतर गावातील दोन घरांचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.
तालुक्यातील वारळ येथे असणार्या स्वयंभू दत्त मंदिरचे आठवड्यापासून सुरू असलेल्या वादळीवारा व सोसाट्याच्या पावसामुळे नुकसान झाले आहे.मंदिराचे पत्रे उडाले असून कोब्याला भगदाड पडले आहे.मंदिराच्या इतर भागातदेखील नुकसान झाले असल्याचे तलाठी गोरख माने यांनी संगितले.स्वयंभू मंदिराला वादळवार्यामुळे नुकसान झाल्याचे कळताच सभापति छाया म्हात्रे,तलाठी गोरख माने यांच्यासहित वारळ गावातील ग्रामस्थांनी मंदिराची पाहणी केली.
तालुक्यात आलेल्या वादळीवार्याचा फटका गणेश नगर येथील दत्तात्रेय गाणेकर व घोणसे येथील गणवे कुटुंबीयांना देखील बसला आहे.गाणेकर यांच्या घराची पडवी पडली असून 11800 रुपयांचे तर गणवे यांच्या घराची देखील पडवी पडून 8000 चे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

Post a Comment