जिल्ह्यातील तंबाखू मुक्त तालुका म्हणून गौरविलेल्या म्हसळा तालुक्याला लागला काळीमा.
म्हसळा शाळा नं१ समोर होलसेल तंबाखू विक्री व पान टपरीवर कारवाई.
संजय खांबेटे म्हसळा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मुंबईतील सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ या संस्थेने मुंबई महापालिकेसह पालघर, रायगड व अन्य जिल्हयांत शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. पुढे शासनाने "तंबाखू मुक्त महाराष्ट्र" असे धोरण राबविले परंतु फारसे यश लाभले नाही.२०१५-१६ ला संपूर्ण रायगड जिल्ह्यांत तंबाखू मुक्त शाळा अभियानात म्हसळा तालुका व शिक्षण विभागाला विविध स्तरावर गौरविण्यात आले. परंतु" पुढचे पाठ -मागचे सपाट" या उक्ती नुसार आज म्हसळा शाळा नं १चे समोर होलसेल तंबाखू विक्रीचे सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र व भोला पान टपरीवर म्हसळा पोलीस व तालुका आरोग्य विभागाने २००३ च्या कलम २४ नुसार कारवाई केल्याचे पोसई दिपक डूस यानी सांगितले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामील पथकात शैलेश लाखे, महेंद्र रहाटे, गणेश शिरसाट, श्रीकेश पाटील, पोलीस विभागाचे कैलास लक्कस, ट्राफीक पोलीस अमोल निर्मळ सामिल होते.पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यानी परिसरांतील अन्य तंबाखू, गुटखा विक्री व्यवसायीकाना समज देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
"सध्या जिल्हा व तालुका शिक्षण विभागात प्रचंड दिरंगाई, कामचुकारपणा आहे.२०१५ ला तालुक्यात तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम राबविताना प्रत्येक गावात, शाळेत आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तत्कालीन गट शिक्षण अधिकारी श्रीमती विजया टाळकुटे यांच्या समवेत जाऊन जन जागृती करीत होतो."
महादेव पाटील, माजी सभापती , पं.स. म्हसळा.
कर्करोग होण्यास तंबाखू हा सर्वात महत्वाचा धोक्याचा घटक आहे. देशातील एकूण कर्करोगाच्या प्रमाणापैकी ३४% कर्करोग तंबाखूमुळे होत असून सदर कर्करोग तंबाखू सेवन सोडण्याने थांबविता येण्यासारखे आहे. तंबाखु मध्ये सुमारे ४००० विविध रासायनिक घटक असून त्यापैकी कमीतकमी एकूण ४३८ घटकामुळे कर्करोग होत असतो. धुम्रपानामुळे फुफूस, स्वरयंत्र्, अन्ननलिका व श्वसन नलिकेचा कर्करोग होतो तसेच धुम्रपान स्वादुपिंड, मूत्राशय ,मुत्रपिंड, मुत्रनलिका , प्लिहा व गर्भाशयकर्करोग होण्यास सुध्दा कारणीभूत आहे. तोंडाचा कर्करोग होण्यास तंबाखू सेवन मुख्यता कारणीभूत आहे त्यामुळे मियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल "
डॉ. गणेश कांबळे, ता.आ.अधिकारी, म्हसळा


Post a Comment