संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा पोलीस स्टेशनचा नव्याने कार्यभार घेतलेले पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर याना अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती श्री.कॄष्णा कोबनाक यानी शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, तालुका सरचिटणीस श्री. तुकाराम पाटिल, श्री. प्रकाश रायकर, जिल्हा चिटणीस युवा श्री.महेश पाटील, तालुका चिटणीस श्री.अनिल टिंगरे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा श्री. शरद चव्हाण, सरपंच गोंड़घर श्री.लहू तुरे, तालुका चिटणीस श्री.सुनिल विचारे, तालुका अध्यक्ष वाहतूक सेल श्री.दिनेश बामणे, कु.राकेश हेलोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.कोबनाक यानी तालुक्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आसले तरी भविष्यांत तालुक्यांत कायदा व सुव्यवस्था याहीपेक्षा चोख राहील या साठी शुभेच्छा दिल्या ,तालुक्यांत शांतता रहावी यासाठी आमचा पक्ष , पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे प्रशासनाला सहकार्य राहील असे कोबनाक यानी सांगितले .

Post a Comment