पाभरे पारोडा येथे दुर्गामातेची स्थापना



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यातील पारोडा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दुर्गमातेची स्थपना करण्यात आली आहे. पारोडा मध्ये कुंभार, कुणबी, सुतार व नाभिक असे चार समाजातील ग्रामस्थ, महिला मंडळ व युवा मंडळ एकत्र येऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवितात. या निमित्याने गावामध्ये श्री दुर्गमाता आगमन होत असताना मिरवणुक सोहळा काढून संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरण तयार केले जाते. तसेच मंडळातर्फे वृक्षारोपण व ग्रामस्वच्छता सारखे सामाजिक कार्यक्रम व मुलांसाठी संगीत खुर्ची, मटका फोडी, फनी गेम, मुलांचे डान्स यासारखे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते त्याचबरोबर सकाळी व संध्याकाळी श्री दुर्गामातेची आरती व दुपारी महिला व ग्रामस्थांचे भजन आणि रात्री गरबा नृत्य असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले असतात अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी यांनी दिली असून तालुक्यातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा