म्हसळा(निकेश कोकचा)
संपूर्ण देशात मुलीच्या जन्माआधीच तिची भ्रूणहत्या होत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे आपण वारंवार ऐकत आलो आहोत.मात्र म्हसळा पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्याने आपल्या मुलीचा चौथा वाढदिवस तिचा हट्टा करिता आदिवाशी मुलांसोबत साजरा केला आहे.
म्हसळा पोलिस ठाण्यातील समर्थ सांगळे या पोलिस कर्मचार्याच्या मुलीचा सोमवारी चौथा वाढदिवस होता.श्रीतेजा हिने आपल्या पप्पान जवळ वाढदिवस आदिवाशी मुलांसोबत साजरा करण्याचा हट्टाहास केला.यानंतर श्रीतेजाच्या पप्पानी म्हणजे पोलिस कर्मचारी सांगळे यांनी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन आपल्या मुलीचा वाढदिवस म्हसळा आदिवाशी वाडी येथील आंगणवाडी व जिल्हापरिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य,फळ व चॉकलेट देऊन साजरा केला.यावेळी हिंदू समाज अध्यक्ष भाऊ करडे,व्यापारी कांतीलाल जैन,दुर्जन राजपूत,सलीम चौगले,नानू मेमन,राष्ट्रवादीचे किरण पालांडे,सेनेचे अमित महामुनकर,आदिवाशी समाज उपाध्यक्ष वसंत जाधव,प्र.मुख्याध्यापक महेश अशोक राव,पोलिस कर्मचारी नामदेव जाधव,अमोल निर्मल,तात्यासाहेब तोरसल्ले उपस्थित होते.पोलिस कर्मचारी समर्थ सांगले यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस आदिवाशी मुलांसोबत साजरा केल्याने संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.यावेळी श्रीतेजा हिने देखील शुभेछा देणार्यांचे आभार मानले.


Post a Comment