शिवशंभो युवा प्रतिष्ठानचे कौतुकास्पद कार्य.


मुरूड-जंजिरा प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत भोईघर हद्दीत पावसामुळे पडलेले खड्डे बुजविण्याचे काम शिवशंभो युवा प्रतिष्ठान च्या युवकांनी केलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत भोईघर हद्दीतील बेलवाडी ते मांडला रस्त्यावर खूपच खड्डे पडले होते, तेच खड्डे भरण्याचे काम, दहीहंडी निमित्त एक सामाजिक बांधिलकी समजून घेत हा उपक्रम हाती घेतला. गावातील युवकांनी एकत्र येत गावातील ३ टेम्पो घेऊन ६ टेम्पो माती व खडी टाकवून आपल्या नेहमीच्या मार्गावर पावसामुळे खड्डे झाले ते भरण्याचे काम केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे पंचक्रोशीतुन कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा