स्त्रीत्वाने संस्कारित युवा पिढी घडली आहे ....अदिती तटकरे (जिल्हा परिषद अध्यक्ष )
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
भारतीय संस्कृती व संस्कार याचे दर्शन मंगळागौर च्या सांस्कृतिक कार्यक्रमातून होत आहे .आधुनिक काळात स्त्रीने नावीन्याचा स्वीकार करत जगातील सर्व क्षेत्र पादाक्रांत केले आहेत .असे प्रतिपादन अदिती तटकरे यांनी मंगळागौर नृत्य स्पर्धेच्या समारोप प्रसंगी केले .
आगामी काळात विविध स्पर्धेचे आयोजन करून श्रीवर्धन तालुक्यातील स्त्रीयांना व्यासपीठ उपलब्ध करुन देऊ .संस्कृती संवर्धना सोबत स्त्रियांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आपण मंगळागौर नृत्य स्पर्धेचं आयोजन केले आहे .स्त्री म्हणजे सहनशीलता , वात्सल्य , प्रेम , धीरोदात्तपणा याचे मूर्तीमंत उदाहरण आहे .स्त्रीत्वाने संस्कारित पिढी घडवली आहे .असे अदिती तटकरे यांनी म्हटले .आज मंगळागौर नृत्यात सामाजिक , शैक्षणिक , समाज प्रबोधनात्मक आदी रूपकात्मक बाबीचे यथार्थ वर्णन करण्यात आले .राज्यातील पुरग्रस्थांच्या व्यथा , देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिकांच्या कुटूंबातील व्यक्तीच्या भावना हे सर्व मार्मिक व लक्ष्यवेधी होते असे अदिती तटकरे यांनी सांगितले . श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली , दिवेआगार , श्रीवर्धन शहरातील महिला संघांनी सदरच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे .नृत्याचे प्रथम क्रमांक नटेश्वर ग्रुप , द्वितीय स्नेह व तृतीय क्रमांक नारीशक्ती ग्रुप मिळाला आहे .
सदरच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा दीपिका चिपळूणकर याच्या हस्ते झाले . कार्यक्रमासाठी प्रणिता माने शहर अध्यक्ष , ऋतुजा भोसले उपजिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी , ज्योती परकर तसेच नगरसेवक ,रहमत आराई ,दिशा नागवेकर , शोभा गोरनाक , गुलाब मांडवकर व कामिनी रघुवीर आणि मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या .

Post a Comment