महावितरणच्या थकबाकीमुळे बी.एस.एन.एल.टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत .


महावितरणचा बी.एस.एन.एल. च्या मोबाईल टॉवरना झटका
संपूर्ण तालुका झाला नॉट रिचेबल : शासकीय यंत्रणा ठप्प
संजय खांबेटे म्हसळा 
महावितरणच्या  म्हसळा उप- विभागात येणाऱ्या बी.एस.एन. एल. टॉवरच्या रु १५ लक्ष २९ हजार ९०३ थकीत बिलाचे वसुली साठी म.रा. वि.वि. कंपनीने म्हसळा तालुक्यातील ९ टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. तालुक्यातील बी.एस.एन.एल. च्या लिपणीवावे, आंबेत, म्हसळा, सुरई, वांगणी, कोळे, मेंदडी, कोळे, संदेरी, पांगळोली या गावातील टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्याचे उप कार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यानी सांगितले. घरगुती,
वाणिज्यीक आणि औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकी सोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसूल करण्या सोबतच थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करा आणि वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची नोंद प्रणालीत करण्याच्या स्पष्ट सूचना वरीष्ठ कार्यालयांतून आल्या आहेत. प्रत्येक लाईन स्टाफला थकबाकी वसुली आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे दैंनंदिन लक्ष्य दिले असून, थकबाकी वसुली अथवा वीजपुरवठा खंडित असे दोनच पर्याय ग्राहकापुढे ठेवा, थकबाकी वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्या सोबतच काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात घरगुती ग्राहक १७०८ थकीत रक्कम रु ५५ लक्ष, २२ हजार ३८१ ,वाणिज्यीक ग्राहक २८८ थकीत रक्कम रु ३२ लक्ष ७१ हजार र०४, उद्योग ग्राहक ४८ थकीत रक्कम रु ६ लक्ष, १९ हजार ८०१, शेती ग्राहक १०१ थकीत रक्कम रु १लक्ष, ३६ हजार ८४६ , इतर ग्राहक १७६ थकीत रक्कम रु ११ लक्ष, ९२ हजार ६१ आसल्याचे वानखेडे यानी सांगितले.

"विज बील थकबाकीदारांची संख्या व रक्कम फार मोठया प्रमाणात आसल्याने आक्रमकतेने कारवाई करून वसुली करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या वरीष्ठ कार्यालयाचे आसल्यामुळे बी.एस.एन.एल.टॉवरचा विद्युत पुरवठा कट करावा लागल्याचे विद्युत मंडळाचे प्रवक्त्याने सांगितले. तालुक्यात २३१५ घरगुती, वाणीज्य , उद्योग, शेती व इतर वापराचे ग्राहकांकडे रु १ कोटी ७लक्ष २९ हजार ३२१ विज बिलापोटी थकीत रक्कम बाकी आहे".
सतीश वानखेडे,उप कार्यकारी अभियंता,
म.रा. वि.वि. कंपनी , म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा