म्हसळा पंचायत समितीची इमारत पूर्णत्वाकडे : रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक.



संजय खांबेेटे : म्हसळा प्रतिनिधी

   म्हसळा पंचायत समितीच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या  इमारतीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे . आता प्रशासना समोर रिक्त पदे भरणे ही समस्या रहाणार आहे.
    नव्याने बांधण्यात येणारी इमारत हीचे काम गेले ५ वर्षा पासून सुरू आहे.अत्यंत भव्य -दिव्य असणाऱ्या ही इमारत शहरांत आदर्श अशी ठरेल, ग्रीन बील्डींग संकल्पने नुसार नैसर्गिक प्रकाश योजना,वायु विजन, उर्जेच्या वापरात काटकसर व पर्जन्यजल पुर्नभरण व जास्तीत जास्त पर्यावरण पुरक बांधकाम साहीत्याचा वापर करण्यात आला आहे. १०२६.५० चौ. मी. चे बांधकाम या इमारतीत असणार आहे.
  इमारती मध्ये सभापती -उपसभापतीं साठी स्वतंत्र कक्ष , त्या बरोबर B.d.o,अस्सी. B.d.o , सामान्य प्रशासन, अर्थ, ग्रामपंचायत, कृषी,पशुसंवर्थन, आरोग्य- शिक्षण, बांधकाम, ग्रा.पा.पुरवठा, ICDS  असे विभाग असणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत विभागात ५० %  लोकप्रतिनिधी महीला असतात त्यांच्यासाठी स्वतंत्र  बैठक कक्ष असावा अशी मागणी तालुक्यातून  होत आहे.


"इमारत होत असताना जिल्हा परिषद व पंचायत समिती कडील विविध विभागातील सरासरी ५० % पदे रिक्त आहेत. त्यामध्ये पंचायत समिती ३० %,पशुसंवर्धन ४०%, बांधकाम ६५ %, आरोग्य विभाग ६० % (ता.आरोग्य, प्रा.आ. केंद्र म्हसळा, मेंदडी, खामगाव ) शिक्षण ५० %, ग्रा.पा.पु ५० % , ए.बा.वि.से.योजना ४० % पदे रिक्त आहेत ती भरण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी नी पाठपुरावा करणे जरुरीचे आहे"
महादेव पाटील , सदस्य जिल्हा नियोजन समिती.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा