बनोटी येथे अतिवृष्टी मुळे वाहून गेलेल्या शेतकर्या च्या कुटुंबाचा आ.अनिकेत तटकरे यांच्याकडून सांत्वन: अवघ्या तीन दिवसांच्या आत चार लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान
म्हसळा(निकेश कोकचा)
म्हसळा तालुक्यातील बनोटी येथील शेतकरी हरिश्चंद्र गाणेकर हा शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी गुरे चरवण्यासाठी जंगलामधे गेला असताना अचानक पावसाचा जोर वाढला.गाणेकर गुरांना परत घरी घेऊन येतानी जंगलामधून वाहणाऱ्या पाण्याच्या ओंढामधून त्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गाणेकर याचा शव सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी खरसई धरणामध्ये मिळाला होता. आ.अनिकेत तटकरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मृत गाणेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. गाणेकर यांच्या पाच्छात त्यांची पत्नी जना हरिश्चंद्र गाणेकर हिला नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्यां आपदग्रस्त तरतूद अंतर्गत अवध्या तीन दिवसांच्या आत आ.अनिकेत तटकरे यांनी चार लाख रूपयांचा धनादेश देऊन मदत केली.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष शैलेश पटेल, सभापति छाया म्हात्रे, उप सभापति संदीप चाचले,राष्ट्रवादीचे नेते बाळ करडे,तालुका अध्यक्ष समीर बनकर, तहसिलदार शरद गोसावी,सर्कल दत्ता कर्चे, तलाठी शहा तात्या,बनोटी सरपंच अनंत हरी कांबळे, समन्वय समिति सदस्य तुकाराम पाटील,लहू म्हात्रे उपस्थित होते. आ.अनिकेत तटकरे यांनी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देखील गाणेकर कुटुंबाला मदत करण्याचे तहसिलदार गोसावी यांना यावेळी सूचना केली.



Post a Comment