म्हसळा तालुक्यातील खंडीत वीज पुरवठयावर कायम स्वरुपी उपाय योजनेच्या जनता प्रतिक्षेत : ६० ते ६५ गावाना होत आहे खंडीत विज पुरवठा
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील ६०ते ६५ गावातील विद्युत पुरवठा गेले काही दिवस बंद होता. त्यामुळे येथील नागरिक, व्यापारी व व्यवसायीक वर्गांमध्ये सध्या असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजनांनाही त्याचा फटका बसत असून जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच शासकीय,निमशासकीय कार्यालयानाही याचा मोठा फटका बसत आहे. विद्युत वितरण कंपनीने येथील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व सातत्याने सुरु करावा अन्यथा येथील जनतेच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागेल अशी भावना येथील जनतेत आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वीज बिल कलेक्शनमध्ये म्हसळा तालुका कायम वरच्या क्रमांकावर राहिलाआहे.मात्र येथील जनतेला सुरळीत वीजपुरवठा देण्यात विद्युत वितरण कंपनी मात्र कायम खालच्या क्रमांकावर राहिले आहे.
या खंडित होणाऱ्या विजपुराठ्याबाबत येथील जनतेने सनदशीर मार्गाने वेळोवेळी निवेदने केली. मात्र, याचा काडीमात्र फरक येथील कारभारावर पडला नाही. त्यामुळे येथील जनतेत वीज वितरण कंपनी बाबत चांगलाच असंतोष पसरला आहे. लवकरात लवकर म्हसळा सब डीव्हीजननने आपल्या कारभारात सुधारणा केली नाही व या भागातील गावांना अखंडित वीजपुरवठा केला नाही तर त्यांना येथील जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले असेच वातावरण सध्या येथील जनतेत निर्माण झाले आहे.
तालुक्यातील आंबेत, खामगाव, लेप, कणघर, ताम्हने शिर्के,कासरमळई, वांगणी, देहेन, कृष्णनगर, सोनघर, संदेरी, फळसप, आमशेत, लिपणीवावे, पांगलोली, कुडगाव, मांदाटणे, पाष्टी, मोरवणे , कोळवट,रातीवणे, चिरगांव,भापट, देहेन, घोणसे, चिखलप, देवधर, कुडतोडी, सुरई, ढोरजे, निगडी, कांदळवाडा, सकलप, तोंडसुरे,बनोटी,खरसई, मेंदडी, वारळ, तुरुंबाडी, रोहीणी, वाडांबा, जांभूळ, नेवरूळ, केलटे, पानवे, कोंझरी, तळवडे या बहुतांश भागातील ७ ते ८ दिवस बत्ती गूल होती.
" भविष्यांत म्हसळा शहरासह तालुक्यांतील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होऊ नये, म.रा. वि.वि. कंपनीच्या बाबतीत म्हसळाकर जनतेनी तालुक्यात " अक्षय प्रकाश योजना राबविली होती, बील Payment च्या बाबतीत सुध्दा म्हसळा कर आघाडीवर असताना विजमंडळाने म्हसळा कराना त्रासांत टाकू नये"
इकबाल दाऊद उर्फ बाबाजान पठाण, स्वीकृत नगरसेवक, नगरपंचायत , म्हसळा.
" म्हसळा तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ व उर्वरीत खाडीलगत आहे, म्हसळा फिडर वरील लोड कमी करण्याचे काम व गोंडघर फीडर पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे . येत्या २-३ दिवसांत म्हसळा शहरासह तालुक्यात सातत्याने विद्युत पुरवठा सुरु होईल."
सतीश वानखेडे, उप- कार्यकारी अभियंता, म.रा. वि.वि. कंपनी, म्हसळा

Post a Comment