तालुक्यातील २७ गावे ९ दिवस अंधारात : महावितरणचे दुर्लक्ष


महेश पवार : म्हसळा
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेतीसहीत घरातील वीज उपकरणांचे नुकसान झाले आहे . म्हसळ्यात गेले ९ दिवस २७ गावांमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू आहे . याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे . दरम्यान सध्या जोराचा पाऊस असल्याने या गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे . तसेच सलग ९ दिवस दूरध्वनी , मोबाईल सेवा ठप्प आहे . याचबरोबर विजेच्या लपंडावामध्ये अचानक येणारा विजेच्या दाबामुळे २७ गावातील सामान्य व्यापारी दुकानदार यांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाला आहे . टीव्ही , वॉशिंग मशीन , बल्ब , मिक्सर , दुकानातील फ्रीज व अन्य विजेच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत . दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यात यंदाही विजेचा लपंडाव सुरूच आहे . हा लपंडाव थांबविण्यासाठी पावसाळी पूर्वी मुख्य लाईन लगत वृक्षांची छाटनी केली जाते . त्या छाटनीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो . मात्र त्याचा हेतू सफल होतच नाही . पावसाळ्याचे काही दिवस वगळता विद्युत मंडळाचे कर्मचारी अगदी मोकळे असतात . पावसात येणा-या अडचणी आता दूर करण्याची मानसिकता देखील त्यांच्याकडे नाही . यामुळे आता पावसाळ्यात अंधारात राहण्याची वेळ सहन करावी लागत आहे . वाडाबा मार्गे तळवडे , तोराडी या भागाकडे विद्युत मंडळाचे कर्मचारी विशेष लक्ष का देत नाहीत असा सवाल आहे . त्याचबरोबर त्या भागामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी , माजी उपसभापती मधुकर गायकर , जिल्हा परिषद सदस्य बबन मानवे , माजी सभापती रविंद्र लाड , माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली सावंत एवढी दिग्गज नेते असताना २७ गाव का अंधारात असा संतप्त जनक सवाल तेथील नागरिक विचारत आहेत . दरम्यान येत्या काळात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा परिणामाला सामोर जा असा निर्वाणीचा इशारा माजी सभापती रविंद्र लाड यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. 

महावितरणचे दुर्लक्ष : म्हसळा तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे . यामुळे येथील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे . त्यातच वारंवार आवाहन करूनही वीज समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे . याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा