संजय खांबेटे : वार्ताहर
म्हसळा तालुक्यातील बनोटी येथील हरीचंद्र चांगू गाणेकर वय ५५ हा गुराखी घरी गुरे आली तरी तो परत आला नाही , तो बेपत्ता झाल्याची नोंद अपत कालीन कक्ष व म्हसळा पोलीसांत नातेवाईकानी केली होती , तो आज सोम. दिं५ रोजीखरसई धरणांत मृत स्थितीत सापडला.
सदरची घटना शनी. दि. ३ रोजी घडली, गावातील तसेच पंचकोषीतील रेवली, बाऊलचे ग्रामस्थ दि.३ ची रात्र दि. ४ला सर्व परीसर पिंजून काढत असताना आज सोमवार दि. ५ रोजी हरीचंद्रचा मृतदेह खरसई धरणात सापडल्याचे पो.नी. परशुराम कांबळे यानी सांगितले .म्हसळा पोलीसानी अ. मृ. रजी.१२ / २०१९ ने केली आहे. ३-४ घटनास्थळी कार्यकारी इंडाधिकारी तथा तहसीलदार शरद गोसावी, पो. निरीक्षक परशुराम कांबळे यानी भेट दिली.हरीचंद्रच्या ताब्यातील गुरांपैकी एक बैल खरसई जंगलाच्या दिशेने गेला त्याला त्याने बनोटीकडे फिरवला त्याच दरम्यान एक वहाताओहोळ कॉस करताना हरीचंद्रचा पाय घसरला व तो धरणांत पडला असावा असा स्थानिक शेतकऱ्यांचा अंदाज आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असल्याचे समजते.
"गेले तीन दिवस तालुक्यात ५०२ मि.मि. पावसाची नोंद झाली,घटना घडली त्या दि.३ रोजी खरसई,बनोटीच्या जंगलात सायं. च्या दरम्यान ढगफुटी प्रमाणे पाऊस व सोसाट्याचा वारा होता."
-भाऊ पयेर, शेतकरी

Post a Comment