बोर्लीतील संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा ; महावितरणचा प्रतिकात्मक पुतळा जाळला , सपोनि शेलार यांना दिले निवेदन


बोली पंचतन : अभय पाटील
सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या बोर्ली पंचतन नागरिकांनी अखेर गावात निषेध मोर्चा काढला. याबरोबरच महावितरणचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. यापुढे वीजपुरवठा खंडित झाल्यास श्रीवर्धन महावितरण कार्यालयावर धडकणार, असे सांगतानाच संतप्त भावनांचे निवेदन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि महेंद्र शेलार यांना दिले. बोर्ली पंचतन परिसरामध्ये पावसाने वितरणचे चांगलेच धिंडवडे निघाले . पावसामुळे बोर्ली पंचतनसह दिवेआगर , भरडखोल, शिस्ते, वडवली , ववलास, आदगाव , कुडगाव , दिघी आसपासच्या छोट्या - मोठ्या खेडेगावातील वीजपुरवठा आठवडाभर खंडित झाला होता . बुधवारी सायंकाळी बोर्ली पंचतन ग्रामस्थांच्या वतीने महावितरणाच्या विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . विशेष म्हणजे मोर्चा चालू होण्याआधीच वीज पुरवठा सुरळीत झाला . मात्र संतप्त ग्रामस्थांनी महावितरणाचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला . पुन्हा जर वीजपुरवठा खंडित झाल्यास श्रीवर्धन येथील वितरण कार्यालयावर धडकणार असल्याचे सांगण्यात आले . दरम्यान मागील पूर्ण आठवडा पावसाने थैमान घालताना परिसरामध्ये प्रचंड नुकसान केले . यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन विभाग आठवडाभर अंधारामध्ये होता . यामुळे बँका , महत्वाची कार्यालये यांचे कामकाज पूर्ण बंद होते . व्यापारी वर्गाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . सर्व मोबाईल नेटवर्क बंद होते . यामुळे नागरिकांना आठवडाभर त्रास सहन करावा लागला . मागील दोन वर्षांमध्ये वीज वितरणने गोंडघर सबस्टेशनसाठी पाभरा म्हसळा येथून उभे केलेले विद्युत खांब सलग दुसऱ्या पावसाळ्यामध्ये वाऱ्याने पडले . दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी वितरणाचा निषेध करण्यासाठी बोर्ली पंचतन ग्रामपंचायत येथून निषेध मोर्चा काढण्यात आला . हा मोर्चा एस टी स्टॅन्ड - शिवाजी चौक , दिवेआगर फाटा ते बोर्ली पंचतन येथील दिघी सागरी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला . दरम्यान यापुढे असाच वीज पुरवठा खंडित झाल्यास श्रीवर्धन येथील वितरण कार्यलयावर ग्रामस्थ आक्रमकपणे थडकतील व त्यास पूर्णतः वीज वितरण जबाबदार असेल असा इशारा यावेळी माजी जि . प . सदस्य शाम भोकरे यांनी दिले . या मोर्चामध्ये सरपंच नम्रता शेलार , उपसरपंच मन्सूर गिरे , शिवसेना उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर , माजी जि प सदस्य शाम भोकरे , राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते सुजित पाटील , शेकाप अल्पसंख्याक तालुका प्रमुख अन्सार चोगले , मुस्लिम समाजाध्यक्ष इम्रान परदेशी , मसूद दर्जी , माजी सरपंच निवास गाणेकर , तंटामुक्त अध्यक्ष शंकर मामेकर , चंद्रकांत तोडणकर , शिवसेना शाखाप्रमुख नंदू भाटकर , नंदू पाटील , ग्रामपंचायत सदस्य उत्तम दिवेकर , संतोष कांबळे , प्रकाश तोंडलेकर , संतोष पयेर , नुझहत जहांगिरदार , ज्योती परकर , प्रिया पाटील , प्रियांका मुरकर , युवा सेना तालुकाधिकारी संदेश म्हसकर , युसूफ लांडगे , निसार दर्जी , अखलाक उल्डे तसेच शेकडो ग्रामस्थ मोर्चामध्ये सहभागी झाले होते दरम्यान वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे बोर्लीपंचतन परिसरात तीव्र नाराजी आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा