प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तालुक्यात जोरदार पावसामुळे ४७ कुटुंबाचे नुकसान झाले . यामध्ये घरांचे , शेतीचे नुकसान झाले आहे . दरम्यान प्रशासनाकडून दुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यात झाली असून तातडीने पंचनामे करण्यात आले . याबाबत तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे . म्हसळा तालुक्यात यावर्षी पावसाने जोरदार नुकसान केले आहे . गेले आठ दिवस पडलेल्या पावसाने तर कहरच केला आहे . अनेक लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे . नुकसान झालेल्यांमध्ये रामदास विठ्ठल वारलकर यांच्या घराचे १ , ७० , ००० त्याप्रमाणेच नुरबेगम शौकत हजवाने बंडवाडी यांच्या घरामध्ये सर्व धान्य , विद्युत उपकरणे १, २१ , ००० नुकसान होऊन त्यांचे पंचनामे केले आहेत . इतर झालेले नुकसानामध्ये चिखलप अशोक पवार - मेंदडी कोंड , जनार्दन धुमाळ - तोंडसुरे , रविंद्र भायदे - मांदाटने , सुडकोजी पवार - मेंदडी कोंड , लक्ष्मण धुमाळ - पाभरे कोळीवाडा , नथुराम बसवत - पाभरे चाफेवाडी , लोंडीबाई नाक्ती - पाभरे कोळीवाडा , वसंत कांबळे - पाभरे कोळीवाडा , मेंदाडकर - चिखलप आदिवासीवाडी , संगीता हिलम - देवघर कोंड , धोंडू शिंदे - खारगाव बुद्रक , काशीबाई म्हात्रे - खारगाव बुद्रुक , चांगुणा म्हात्रे - वारळ , रामदास वारळकर - बारळ , पद्माकर दिवेकर , मुजफर कादिरी - तुरुंबाडी , गोपाळ नाक्ती - काळसुरी , श्रीधर सावकार - काळसुरी , जनार्दन म्हात्रे - वारळ , काशिनाथ मांदाडकर - खरसई , नुरबेगम हजवाने - बंडवाडी , अर्जुन गिजे कांदळवाडा , शहनाज शौकत बंडवाडी , बबन चाळके - घोणसे , महादेव महाडिक - जांभूळ , राजेश खारगावकर - खामगाव , केरू गायकर - गौळवाडी जयवंती उचाटे - सोनघर , सुभाष पाडावे - सोनघर शकील चीलवाल - वावे , मुखत्यार कारवीनकर बावे , संतोष मोरे , चेतना पारवे - मायमखार विमल दळवी - तोराडी , विशाखा कदम - पेंढाबे काशिनाथ बसवत - पाभरे , किसन शिंदे - कोळवट गणपत शिंदे - कोळवट , सखाराम सावंत - कोळवट काशिनाथ बसवत - कोळवट , एवढ्या लोकांचे नुकसान झाले आहे . याठिकाणी जावून पंचाखाली गेली आहे . एकीकडे पावसाच्या जोरामुळे राहत्या घराचे नुकसान झाले आहेत . तर दुसरीकडे कुटुंबाला पोशिंदा असणारी शेती आज उद्ध्वस्त झाली यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत .
पडझडीने नष्ट झालेल्या झोपड्यांना ६ ,००० तर नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र पाण्यात बुडत असेल तर त्यांना २,५०० तसेच पक्कीघरे १५ % पडझड झाली असेल तर त्यांना ६ ,००० अशी तुटपुंजी रक्कम शासनाकडून देण्यात येते. शासन नुकसानग्रस्तांची चेष्टा करत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .
तालुक्यात १ ऑगस्टपासून पावसाचे थैमान सुरू आहे . तालुक्यात पाहणी केली असता ४७ लोकांचे मोठे नुकसान आहे . याचे त्वरित पंचनामे करण्यात आलेले आहेत . शासकीय निकषाप्रमाणे नुकसानभरपाई येत्या चार दिवसात देण्यात येईल.
शरद गोसावी , म्हसळा तहसीलदार

Post a Comment