म्हसळा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेत ३८ अर्ज मंजूर : अनुदानात वाढ केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका संजय गांधी निराधार समीतीची बैठक अध्यक्ष प्रकाश रायकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी सदस्य अनिल टिंगरे, यशवंत म्हात्रे, तहसीलदार शरद गोसावी, RNT के.टी. भिंगारे, पं.स. कक्ष अधिकारी चौधरी,संजय गांधी निराधार योजनेचे अ.का. विशाल भालेकर,एस.डी.लिमकर, नूतन गोविलकर या बैठकीत सामाजिक सहाय्य योजने अंर्तगत ४२ प्राप्त अर्जांपैकी ३८लाभार्थींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार विधवा योजना ७, संजय गांधी अपंग योजना १२, इंदिरा गांधी विधवा योजना ५, श्रावण बाळ योजना १३, श्रावणबाळ अपंग योजना १ असे ३८ अर्ज मंजूर झाले. संजय गांधी निराधार योजने अंर्तगत मिळणारे अनुदानात वाढ होऊन रु १ हजार करण्यात आले आहे.यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री मंडळाचा आभिनंदनाचा ठराव करण्यात आला .

Post a Comment