कुडेकर इंटरनॅशनल स्कुल तर्फे शंकर मंदिर परिसरात वृक्षारोपण


म्हसळा ( बाबू शिर्के)
एस जी के इंटरनॅशनल स्कुल तर्फे दिनांक 17 जुलै रोजी शंकर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी हिंदू समाज अध्यक्ष सुभाष करडे, मंगेश म्हशीलकर, संजय खताते, सुरेश कुडेकर, नरेश विचारे, महेश खराडे, आणी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. एस जी के स्कुल पासून शंकर मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली,झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश व घोषणा या वृक्षदिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला.प्रत्येक जबाबदार नागरिकाने निसर्गाची जपणूक करताना जास्तीत जास्त पर्यावरणपूरक झाडे लावून निसर्गाचा समतोल राखण्यास हातभार लावावा. झाडांचे संगोपन करून परिसर निसर्गसंपन्न करावा, असे आवाहन यावेळी हिंदू समाज अध्यक्ष भाऊ करडे यांनी केले.आलेल्या सर्व मान्यवरांचे एस जी के स्कुल संस्थापक सुरेश कुडेकर यांनी आभार मानले आणी पुढील वर्षी आणखी मोठा वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा