पर्यटकांना खुणावतोय देवघर येथील स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिराजवळील धबधबा



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

   निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या म्हसळा तालुक्यातील देवघर येथील स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिराजवळील धबधबा ओसंडून वाहू लागल्याने विकएंड ला सध्या येथे पर्यटकांची मांदियाळी वाढू लागली आहे. 
   सविस्तर वृत्त असे की म्हसळा तालुक्यापासून 4 किमी व दिघी - पुणे महामार्गापासून केवळ दिड किमी लांब असलेल्या व सुमारे 20 फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्यावर जाण्यासाठी मंदिरापासून रस्ता तयार करण्यात आला आहे . धबधब्याची रुंदी 30 फूट तर उंची 20 फूट असून डोंगरदऱ्यातून येणाऱ्या या स्वच्छ पाण्यामूळे व वाहून जाण्याची कोणतीही भिती नसल्यामूळे अनेक पर्यटक या धबधब्यावर कुटुंब व मित्र मंडळी सह आवर्जुन येत आहेत. पर्यटकांना त्यांच्या गाडया पार्क करण्यासाठी जागेची सोय करण्यात आली असल्यामुळे पर्यटकांना कशाचीही अडचण वाटत नाही. शिवाय नवसाला पावणारे स्वयंभू श्री अमृतेश्वराचेही दर्शन मिळत असल्याने एकाच वेळी पर्यटन व देवदर्शन असा योगायोग घडून येतो. शिवाय हा धबधबा अत्यंत स्वच्छ व एकांतात असल्याने व धबधब्याच्या वर येणारे पाणी दगडात गायीच्या कोरलेल्या मुखातून येत असल्याने ते गायमूख पाहण्यासाठीही पर्यटकाना अन्य धबधब्यांपेक्षा हा धबा जास्तच आकर्षित करीत असून मंदिराठीकाणी असणाऱ्या या धबधब्याचे पावित्र्य जपण्यासाठी पर्यटकांनी आततायीपणे  मद्यपान व मांसाहार न करता या धबधब्याचा आनंद घ्यावा असे आवाहन देवघर व देवघर कोंड ग्रामस्थातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा