श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकाम ढासळण्यास सुरुवात ; मेरिटाइड बोर्ड चे दुर्लक्ष


श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकाम   ढासळण्यास सुरुवात : किनाऱ्यावरील सुशोभीकरणास  अवकळा ; मेरिटाइड बोर्ड चे दुर्लक्ष

समुद्रा लगतच्या पायऱ्या पर्यटकांसाठी धोकादायक

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन सदैव पर्यटकांनी गजबजलेले असते .पर्यटनातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्याला धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबत निसर्गाचे वरदान आहे .त्यामुळे महाराष्ट्रातून नव्हे तर देशातील विविध राज्यातून पर्यटक श्रीवर्धन मध्ये हजेरी लावतात .श्रीवर्धनचा नयनरम्य समुद्र किनारा सर्वांना साद घालत असतो  . समुद्र किनाऱ्यावरील धुपप्रतिबंधक बंधारा चालू वर्षी जोरदार झालेल्या पावसामुळे ढासळला आहे .समुद्र लगत च्या पायऱ्या लाटांच्या फटक्या मुळे उध्वस्त झाल्या आहेत .अनेक पायऱ्याचे कठडे तुटले आहेत .फरश्या तुटून पडल्या आहेत .त्यामुळे  पावसाळ्यात पर्यटकांच्या दृष्टीने सदरची बाब धोकादायक ठरू शकते .पावसाळ्यात भरती व ओहोटी प्रसंगी समुद्राचे पाणी  किनाऱ्याच्या जवळ येते अनावधानाने नवख्या पर्यटकास पायऱ्या तुटलेल्या समजले नाही तर  अनर्थ होऊ शकतो  .सन 2009 मध्ये तत्कालीन जल संपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते धुपप्रतिबंधक बंधारा व समुद्र किनारा सुशोभीकरण याचे भूमिपूजन झाले होते .त्यासाठी 14 करोडो रुपये खर्च झाले आहेत .2014 मध्ये काम पूर्णत्वास गेले होते .जवळपास दीड किलोमीटरचा समुद्र किनारा श्रीवर्धन ला लाभला आहे .    समुद्र किनाऱ्यावर आसने बसवणे , विद्युत रोषणाई करणे ,  फरशी बसवणे , अशा विविध कामाचा समावेश करण्यात आला होता. जेणेकरून समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी हा हेतू होता  .सदरच्या सुशोभीकरण व धुपप्रतिबंधक बंधाऱ्यास अवघे  5 वर्ष पूर्ण झालेले नाही तरी सुद्धा समुद्र किनाऱ्याला अवकळा प्राप्त झाली आहे .रोषणाई केलेले दिवे व खांब  मोडकळीस आले आहेत .किनाऱ्यावर केलेली आसन व्यवस्थेतील आसने तुटली आहेत ,अनेक ठिकाणी फरशी निघाली आहे ,जवळपास सगळ्याच खांबांना गंज चढला आहे .धुपप्रतिबंधक बंधाऱ्यास अनेक ठिकाणी क्षती पोहचली आहे .जीवरक्षका साठी तयार  केलेली टेहळणी ची शेड ( कमान ) याचे पत्रे सुद्धा तुटले आहेत .त्यामुळे वेळीच मेरिटाइड बोर्ड व नगरपालिका प्रशासनाने योग्य ती दक्षता घेणे अगत्याचे आहे .संबधित विषयी मेरिटाइड बोर्ड च्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही .


समुद्राच्या जोरदार लाटा मुळे प्रत्येक वर्षी समुद्राच्या किनाऱ्यावरील पायऱ्या तुटतात .त्यामुळे प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण केले जाते .या वर्षी तुटलेल्या पायऱ्या चे तात्काळ नूतनीकरण करू .पर्यटन वाढीसाठी आम्ही प्रयत्न शील आहोत .
-नरेंद्र भुसाने (नगराध्यक्ष श्रीवर्धन )

समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे सुशोभीकरणास अवकळा आली आहे .त्याच्या दुरुस्ती साठी जवळपास 1कोटी 40लाख रुपये निधीची गरज आहे .त्या अनुषंगाने खासदार सुनील तटकरे यांच्या कडे मागणी चा पाठपुरावा करत आहोत .आजमितीस नगरपालिके कडे निधीची कमतरता आहे .येणाऱ्या पर्यटकां वर समुद्र किनाऱ्यावर भ्रमंती व इतर  बाबी साठी कर आकारणी करणे गरजेचे आहे ..वसंत यादव (पर्यटन सभापती श्रीवर्धन नगरपरिषद )

समुद्रकिनारा व धुपप्रतिबंधक बंधारा याचे दायित्व मेरिटाइड बोर्ड असते . नगरपालिकेने   समुद्र किनारा सुशोभीकरणासाठी खर्च करणे अयोग्य आहे .या नुतनीकरणा तून नगरपरिषदेला काडीचा आर्थिक फायदा होत नाही .नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतात वाढ करणे आवश्यक आहे ..... प्रीतम श्रीवर्धनकर (विरोधी पक्षनेते श्रीवर्धन नगरपरिषद )

श्रीवर्धन मध्ये पर्यटक समुद्र किनारा बघण्यासाठी येतात .त्यामुळे समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण  असणे आवश्यक आहे .त्याच सोबत पर्यटन विकासासाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे . ...प्रसाद विचारे (हॉटेल व्यावसायिक श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा