बोर्लीपंचतन - कार्ले नदीतील गाळ काढण्याची मागणी

छायाचित्र : संग्रहित

● जोरदार पावसामुळे पूरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता
● परिसरातील गावांना पावसाळ्यात धोका
● शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज 

श्रीवर्धन : प्रतिनिधी 
 तालुक्यातील बोर्लीपंचतन गावाजवळ असणा - या कार्ले नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे . नदीतील गाळ न काढल्यास जोरदार पावसाने पूरसदृष्य स्थिती निर्माण होण्याची भीती परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून त्याआधी कार्ले नदीतील गाळ काढण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरीत आहे . बोलपंचतन गावाजवळ असणा - या कार्ले नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे . मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे जोरदार पाऊस पडल्यावर नदीला पूर येऊन पुराचे पाणी रस्त्यावर येते . तसेच गावातही पाणी शिरते . दांडगुरी पटवणेजवळील जंगलातून निघालेला डोंगरातील मोठा ओहोळ दांडगुरी नदीला मिळतो . तर नागळोली , बोर्ली , देवखोल अशा गावातून वाहणाच्या नद्यांचे पाणी दांडगुरी नदीला येऊन मिळते व ते पुढे कार्ला नदीतून दिवेआगर समुद्राला मिळते . पण गेली अनेक वर्षे या नद्यांचा गाळउपसा न झाल्यामुळे भरपूर पाऊस पडल्यावर नदीला पूर येतो व रस्त्यावर पाणीच पाणी होते . तसेच गावातही हे पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे . त्यामुळे या नदीतील गाळ काढण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरीत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा