सचिन धाडवे
कणघर गावात "चौरंगी दिन" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कणघर श्री कालभैरव या ग्रामेवतेच्या मंदिर आहे . दरवर्षी प्रमाणे या मंदिरात या दिवशी श्री सत्यनरायणाची महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते हजारो मुंबई आणि ग्रामीण भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे साई पालखीच्या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. तसेच कणघर प्रेमियर लीग "kpl" म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी मोठ्या उत्साहचा दिवस. श्री कालभैरव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कणघर या मंडळाने सुरू केलेला हा छोटासा खेळ आज संपूर्ण जिल्ह्यात नावारूपाला आला आहे .या गावात तरुण , होतकरू मंडळी ऐकत्र येऊन kpl या स्पर्धेचे नियोजन केले होते या स्पर्धेत आठ संघाने तसेच १२८ खेळाडूंनी सहभाग घेतला . विजेता - रुद्र सुपरस्टार श्री. महेश जी डांगे आणि उपविजेता - आरव फायटर श्री. गणेश जी शिगवण अशा प्रकारे kpl ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली

Post a Comment