रूग्णांनाची आस्थेवाईकपणे काळजी घेणारा संपूर्ण कर्मचारी वर्ग...
सर्वच रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणारे डॉ. मा.श्री. मधुकर ढवळे सर यांच्या संदर्भात...
शब्दांकन : श्री. मिठ्ठू (राहुल) त्रिंबक आंधळे
मी माघील आठवड्यात ताप,खोकला तसेच विविध आजाराने आजारी होतो.तेंव्हा श्रीवर्धन (रायगड जिल्हा) येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलो होतो.त्यावेळी मी प्रथमतः केसपेपर घेतला.त्यावेळी तेथे मला असेही समजले कि जेष्ठ नागरिकांना केसपेपर मोफत उपलब्ध आहे. हे मला प्रथमतःच माहिती झाले. केसपेपर घेतला त्यावेळी तेथे माझी भेट खंडाळे साहेब यांच्याशी झाली त्यावेळी त्यांनी मला खुपच योग्य मार्गदर्शन व मदत केली.त्यांनी तेथील डाँक्टर साहेबांना माझ्या आजाराच्या संदर्भात माहिती दिली. त्यावेळी उपस्थित डॉ. साहेबांनी माझी अत्यंत काळजीपूर्वक तपासणी केली तसेच मला एक इंजेक्शन (सुई) दिले.(जे कि आजपर्यंत कोणत्या तरी सरकारी दवाखान्यात मला प्रथमच दिले आहे) तसेच माझ्या रक्ताची तपासणी करायला पण सांगितले तेथील प्रयोगशाळेतील (लँब) मँडम यांनी माझे अत्यंत काळजीपूर्वक रक्त घेऊन तपासले तसेच नंतर अहवाल (रिपोर्ट) दिला.
रूग्णांनाची अत्यंत काळजी घेणारे डॉ.मधुकर ढवळे सर
रक्ततपासणी अहवाल (रिपोर्ट) घेऊन मी येथील मुख्य डॉ. असलेले डॉ. ढवळे सर यांच्याकडे गेलो असतांना त्यांनी माझी पुन्हा एकदा तपासणी केली व सांगितले की, तुम्हाला येथे दाखल (अँडमिट) व्हावे लागणार आहे. सरांनी त्यावेळी माझ्यासोबत अत्यंत काळजीने संवाद साधला.आजपर्यंत सरांचे अत्यंत नाव ऐकून होतो,पण आज प्रत्यक्षात अनुभव आला.
अत्यंत दक्षता घेणारा संपूर्ण कर्मचारी वर्ग...
नंतर मी पहिल्या मजल्यावर येथे गेलो असतांना तेथे माझी पहिली भेट झाली ती अक्षय मिरजकर (ब्रदर) यांच्याशी त्यांनी संपूर्ण उपचार संदर्भात अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले. तसेच माझ्या हातात इंजेक्शन (सुई) पण बसवली व सलाईन लावले.नंतर थोड्याच वेळाने माझी चौकशी करण्यासाठी पुन्हा आले व अत्यंत काळजीपूर्वक तब्येतीची विचारणा केली.तोपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले होते. त्यावेळी तेथे आम्हां सर्व रूग्णांना चहा देण्यात आला.चहा घेतल्यानंतर मी सात वाजेपर्यंत आराम केला.
चहा-नाष्टा-जेवणाची उत्तम मोफत व्यवस्था...
ठिक सात वाजता येथे केमनाईक मावशी जेवण घेऊन आल्या. (मला तर येथे जेवण मिळते हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला...) त्यावेळी माझ्याजवळ जेवण घेण्यासाठी ताट उपलब्ध नव्हते. तेंव्हा बाजूच्या रूग्णालच्या नातेवाईकांनी मला ताट दिले.त्यावेळी मि जेवणाचा पुर्णपणे आनंद घेतला. या रूग्णालयात सकाळी चहा-नाष्टा दुपारी जेवण,संध्याकाळी चहा व रात्रीचे जेवण पुर्णपणे मोफत मिळते हे पाहून मला अत्यंत अभिमान वाटला तसेच अशा प्रकारच्या सेवा सरकारी दवाखान्यात मिळतात हे पाहून आनंद पण झाला.
रात्र पाळीचे दक्ष कर्मचारी वर्ग...
या रूग्णालयात मला पहिल्या दिवशी दाखल केल्यानंतर मला रात्रभर झोपच आली नाही. मी थेट सकाळी 5:00 वाजता झोपलो. त्यावेळी तेथे कामगिरी हजर असणाऱ्या सिस्टर (नर्स) पुर्णपणे आपली कामगिरी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडत होत्या.प्रत्येक कर्मचारी हे अत्यंत तळमळीने, काळजीपूर्वक रूग्णांनाची तपासणी करून प्रत्येकांना धीर देत होते.म्हणजे जसे काय रूग्ण आपला कोणी नातेवाईक असल्यासारखे त्यांना येथील प्रत्येक कर्मचारी चांगली वागणूक देत होते.
डॉ. ढवळे सरांचा तपासणी राऊंड (फेर) नव्हे तर हितगुज कट्टा...
या रूग्णालयाचे मुख्य डॉ. असलेले मा.श्री. मधुकर ढवळे सर होय.जर आपल्या कुटूंबातील कुटुंब प्रमुख चांगले असतील,शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करणारे असतील तर कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात. डॉ. ढवळे सर जेंव्हा प्रत्येक रूग्णांनाची तपासणी करायला प्रत्येकाच्या जवळ जातात तेंव्हा त्या रूग्णांना आपल्यापनाची जाणीव होते.सर प्रत्येक रूग्णांना आस्थेने, आपुलकीने तसेच मोठ्या प्रमाणात धीर देऊन हितगुज साधतात.तसेच आपल्या सोबतच्या कर्मचारी वर्गास योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करतात.
अत्यंत सुंदर मन प्रसन्न करणारी साफसफाई...
आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साफसफाई होय.येथील प्रत्येक साफसफाई कर्मचारी म्हणजे एक मोठ्या भावनेने साफसफाईचे काम करतात या मला चार-पाच दिवसांत चांगलाच अनुभव आला.येथील स्वच्छता ग्रह खुपच छान साफसफाई केलेले आहेत...
आंघोळीसाठी गरम पाणी...
श्रीवर्धन येथील रूग्णालयात खास रूग्णांनाच्या सेवेसाठी,आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
येथील प्रत्येकच कर्मचारी वर्ग रूग्ण तसेच रूग्णांनाच्या नातेवाईकांना प्रेमाने संवाद साधतात.ज्यावेळी माझी सुट्टी झाली तेंव्हा अत्यंत समाधानाने सर्वांचा निरोप घेतला. येथील कर्मचाऱ्यांपैकी विषेशतः रूग्णालयातील सिस्टर-ब्रदर्स (नर्स स्टाप) अत्यंत चांगली वागणूक देतात... येथील सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे तसेच अभिनंदन करतो...
🙏💐
शब्दांकन :- श्री. मिठ्ठू (राहुल) त्रिंबक आंधळे
वाहक श्रीवर्धन आगार, रायगड विभाग
संपर्क क्रमांक..
9850069474, 9975411807

Post a Comment