संजय खांबेटे : म्हसळा
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन ( निमा ) स्टुडंट फोरमच्या महाराष्ट्र राज्य जॉइंट सेक्रेटरी पदी म्हसळा येथिल डॉ.रोनक तन्नाची निवड करण्यात आली आहे. हि निवड निमा असोशिएशनच्या महाराष्ट्र समिती ने केली आहे. डॉ. रोनक तन्ना डॉ.डि.वाय. पाटिल स्कूल ऑफ आयुरवेदा, नेरूळ येथे पदविकेचे शिक्षण घेत आहे.
निमा स्टुडंट फोरमच्या महाराष्ट्र बॉडीवर जॉइंट सेक्रेटरी पदी रायगड जिल्हयातून व डॉ. डि.वाय पाटिल विदयापीठातून पहिल्यांदाच म्हसळा येथिल डॉ. रोनक तन्ना याची निवड झाल्याने संपुर्ण जिल्ह्यातून त्यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.निमा स्टुडंट फोरमच्या महाराष्ट्र बॉडीवर जॉइंट सेक्रेटरी पदी निवड झाल्याने, या निवडीचा अपयोग आयुर्वेद व आयुर्वेदिक चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचे समस्या सोडवण्यात करणार असल्याचे तन्ना यांनी सांगितले.

Post a Comment