म्हसळा तालुक्यातील पाण्याच्या व अन्य गंभीर समस्या सुटाव्या ही जनतेची अपेक्षा
संजय खांबेटे : म्हसळा
.तालुक्यातील जनतेचे रस्ते, पाणी, विज व इतर मुलभूत व पाणी टंचाई बाबत निर्माण झालेल्या गंभीर समस्या या बाबत कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा येथील पांचगाव आगरी समाज हॉल मध्ये शुक्र दिं .३१ मे रोजी सकाळी १०:३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रविण जानू पवार उपविभागीय अधिकारी,श्रीवर्धन यानी कळविले आहे. म्हसळे तालुक्यात मागिल ५ वर्षात कोणत्याही लोकप्रतिनिधीनी अशा पध्दतीच्या बैठकीचे आयोजन न केल्याने या बैठकीला तालुक्यात विशेष महत्व येणार आहे. . तालुक्यातील सर्व विभागाचे खातेप्रमुख, जि.प. व पंचायत समीतीचे पदाधिकारी म्हसळा शहरातील नगरपंचायतीचे Ceo, सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक उपस्थित रहाणार असल्याचे बनकर यानी सांगितले.
तालुक्यातील तोंडसुरे,सकलप खारगाव खुर्द, रेवली, बनोटी,गणेशनगर,वरवठणे,आगरवाडा, पेडांंबे हि गावे आणि जंगमवाडी, तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणे कोंड, आगरवाडा येथील बौद्धवाडी या वाड्यांं व धरण भागातील पाभरे, कांदळवाडा, निगडी आशा गावाना पाभरे धरणातील पाणी सोडल्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई तसेच दुर्गवाडी, चिखलप , लेप ,देहेन, तुरूंबाडी, पांगळोली, कुडगांव, काळसुरी, घोणसे ( वडाचीवाडी, म्हशाची वाडी, केळीवाडी, विचारे वाडी व बौध्द वाडी) या सर्व गाव वाडयांतून पाणी टंचाई उद्भवली आहे. मेंदडी धरण आटल्यामुळे पाण्याचे Dead Stock ची पातळी जॅकवेलच्या खाली गेल्याने मेंदडी, कोंड, वारळ, काळसुरी . तुरुंबाडी या गावाना टँकर सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. शासन दरबारी टँकर मुक्त म्हसळा तालुका अशी नोंद आसल्याने म्हसळा तालुका टॅंकर युक्त होऊ शकत नाही या प्रशासनाचे उत्तरावर आमदार तटकरे काय तोडगा काढणार ?याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
Post a Comment