म्हसळा शहर पाणी टंचाई : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराच होत आहे कुरण



म्हसळा तालुका टँकरमुक्त : शहर मात्र टँकर युक्त

संजय खांबेटे : म्हसळा 
 
म्हसळा शहर पाणी योजना हा विषय शहरांत ज्वलंत झाला आहे शहरातील ८० % नागरीक पाण्या वाचून वंचीत आहे. जिल्हाधिकारी टॅंकरमुक्त तालुक्यांत म्हसळयाचे नाव सांगत असताना म्हसळा शहर टँकरयुक्त कसा ?हा प्रश्न चर्चेचा झाला आहे. मागील २ते ३ वर्ष टॅंकरला झालेला सुमारे रु २५ ते ३० लक्ष कसा खर्च केला किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कारभाराची   चौकशी होणे असे विषय पुढे येत आहेत.
   
      ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यावर सोयी सुविधेत वाढ होईल असा नागरीकाना भास होत असतानाच  नगरपंचायतीच्या काळांत म्हसळा शहरांत भीषण पाणी टंचाई  निर्माण झाली आहे. व त्यामुळे म्हसळा शहरातील नागरिकांना म्हसळा नगरपंचायत कडून दूषित पाणी पुरवठा करण्यात येत  आहे असे दुर्दैवी वास्तव शहरात पहावयास मिळत आहे. हे सर्व घडत असताना म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मात्र गेले अनेक दिवस रजेवर आहेत. याचा शहरातील नागरीकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    म्हसळा शहरांत ग्रामपंचायत अस्तीत्वात असणाऱ्या काळात मंजूर असलेली नळ पाणी योजनेचे अद्यापही राजकारण करीत तब्बल दोन वेळा भूमिपूजन केले. मग आता पाणी कुठे आहे असे मुख्य अधिकाऱ्याना विचारावे तर ते परीक्षेला गेलेत असेच कारण पुढे येत आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे C.E.Oपाण्यापुढे अनुत्तरीत का? असा प्रश्न नागरीकाना पडला आहे.

पाण्याचे राजकारण करणारे मु. का. अ. वैभव गारवे यांच्या नावानी महीला फोडत आहेत खडे. म्हसळा ग्रामपंचायतीची २००९ साली मंजूर झालेली योजना त्याच किमतीने स्विकारणे, तब्बल १० वर्षे होऊनही पाणी पुरवठा योजना पूर्ण न करणे ही कोणती पध्दत अशी चर्चा म्हसळयातील महिला करीत असून ठेकेदाराची मुदत संपली तरी कारवाई का नाही ? हा प्रश्न पुढे येत आहे .

म्हसळा शहर टँकरग्रस्त झाल्याने मु. का. अ. वैभव गारवे आणीत आहेत आर्थिक संकटे .टॅंकर बाबतच्या निकषाचे कोणतेही पालन मु.का.अ. करत नसल्याने नगरपंचायतीवर वार्षिक सरासरी १५ लक्ष रुपयाचे अर्थिक  बुर्दंड होत आहे.नगर पंचायती मार्फत दूषीत पाणी पुरवठा होत असल्याने शहरांत रोगराई मोठया प्रमाणात  फैलावली आहे.
सुरेश कुडेकर, सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा