संजय खांबेटे : म्हसळा
. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दि. १ ते ७ जून २०१९ या कालावधीत युवकांसाठी ‘समाजभान शिबिर’ योजण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ मध्ये न्यू इंडिया (New India) ही संकल्पना मांडली. या संकल्पनेच्या आधारावर म्हाळगी प्रबोधिनीने महाराष्ट्रातील तरुणांसाठी मे २०१७ मध्ये पहिले समाजभान योजले होते. हेच शिबिर यंदा पुन्हा योजण्यात आले आहे.
तरुणांचे आचार, विचार आणि संस्कार हे देशाच्या विचारातील प्रमुख घटक आहेत. तरुण पिढी व्यक्तीगत जीवनात खूप अभ्यासू, कष्टाळू आहे. पण देश, समाज, पर्यावरण अशा विषयांची सजगता कमी पडत आहे असे जाणवते. त्यामुळेच सामाजिक प्रश्न, राष्ट्रीय कर्तव्य अशा अनेक आवश्यक विषयांबाबत त्यांना प्राथमिक गोष्टी माहित व्हाव्यात आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्ता / संस्थांचा त्यांना परिचय व्हावा हाच या समाजभान शिबिराचा मुख्य हेतू आहे.
या शिबिराची संकल्पना सात दिवस, सात सूत्रे, सात कौशल्ये या त्रिसूत्रीवर आधारित असून भारताच्या तरुणाईला, आत्मनिर्भर करणारे, आधुनिक वर्तमानातून सक्षम भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित करणाऱ्या या शिबिराचे "आपणासी ओळखावे आपण’ हे घोषवाक्य आहे.
समाजभान शिबिरात राष्ट्रीय एकात्मता सामाजिक न्याय, ग्राम जीवनाची ओळख, सर्वेक्षण शास्त्राची ओळख, वकृत्व व गट चर्चा, संशोधन आणि सर्वेक्षण, व्यावहारिक नेतृत्व शास्त्राचा परिचय सहभागींना करून दिला जाणार आहे.
या आगळ्या वेगळ्या समाजभान शिबिरात १८ ते २५ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील युवा कार्यकर्ते तसेच समाजशास्त्र, राज्यशास्त्राच्या अभ्यासात रुची असणाऱ्या तरुणांना या ‘समाजभान शिबिरात’ सहभागी होता येईल. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दि. २१ मे २०१९ पूर्वी आपली नावे नोंदणी कार्यालयात नोंदवावीत.
नोंदणीसाठी संपर्क : अनिल पांचाळ – ९९७५४१५९२२ दिलीप नवेले ९९६७४२९४५६
नोंदणी कार्यालय : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, १७ चंचल स्मृती, गं. द. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, वडाळा, मुंबई - ३१. दू.क्र. ०२२-२४१८५५०२ / २४१३६९६६
शिबिर स्थान : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशव सृष्टी, एस्सेल वर्ल्ड रोड, भाईंदर (पश्चिम), जि.ठाणे. संपर्क: ०२२-२८४५०१०१/०२/०३

Post a Comment