श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भिलजे माशांना मागणी आहे . कारण हे भिलजे मासे गोवा , पुणे , व मुंबई , नाशिक या ठिकाणी या माश्यांचे खवय्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच हे मासे खाण्यासाठी चविष्ट लागतात. हे ठराविक सिझनमध्ये भिलजे मासे मिळत असतात . या माश्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते . श्रीवर्धन तालुक्यातील ठराविक गावातील मच्छिमार हे मासे पकडण्यासाठी जातात . हे मासे पकडण्यासाठी लागणारी जाळी तयार करण्यासाठी बरेच दिवस लागतात . शिवाय हे मासे पकडण्यासाठी पहाटे चार ते पाचच्या दरम्यात समुद्रात मध्ये मच्छिमार जात असतात . हे मासे पकडण्यासाठी लागणारी जाळी तेवढी लहान व नाजुक असते की , थोड़ी जरी त्याला एखादी जड वस्तू अथवा पाण्याचा अतिवेगाने वाढला तर ती फाटण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही , त्यामुळेच मच्छिमार या भिलजे मासे पकडण्याच्या जाळ्याची खुपच काळजी घेत असतात . ही मासे पकडून आणल्या नंतर ती मासे सकट जाळी समुद्राच्या किना - यावर घेऊन आल्यावर ती जाळी चार ते पाच मच्छिम र एकत्र येत ती जाळी हलविण्यात येते . आणि त्या मधील भिलजे मासे काढले जातात . ही भिलजे मासे दिसायला पांढरे शुभ्र व खायला चविष्ट असल्याने हे मासे सर्वाना आवडणारे व कमी पैशा मध्ये मिळत असल्याने खवई या माशांना लगेच पंसती करून खरेदी करत असतात . त्याच प्रमाणे व्यापारी लोक हे मासे खरेदी करून ते मासे गोवा , पुणे , मुंबई नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शागणी असल्याने त्या वर्फमध्ये साठवुन करून ती पाठवली जाते . सध्या श्रीवर्धन मध्ये हे भिलजे मासे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने त्याची किमत व्यापारी लोकांनी कमी केली आहे . त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमारांमधून नाराजीचा सुर ऐकायला येत आहे . दरम्यान वातावरणातील बदला मुळे सध्या मच्छिची आवक कमी झाली आहे . यामुळे मच्छिमार नाराज असतानाच श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भिलजे मासे मिळत असल्याने मच्छिमारांसह खवय्ये खुश आहेत ,

Post a Comment