प्रतिनिधी : दिघी
तालुक्यातील उन्हाळ्याच्या काळात श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये , यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे . तालुक्यातील ४९ गावे व १०८ वाड्या टंचाईग्रस्त असून , येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ७७ लाखांचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तालुक्यासाठी तयार केला आहे . तालुक्यातील संभाव्य ४९ गावातील १०८ टंचाईग्रस्त वाड्यांना सहा शासकीय वाहनांनी पाण्याचा पुरवठा सुरु केला जाणार आहे . तर १०४ विंधन तयार करण्याचे प्रस्तावित आहे . मात्र दिघी , कोंढपंचतन परिसरातील टंचाई संपण्याची लक्षणे दिसत नाही. यावेळी तालुक्यातील उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी अटताना दिसत आहे . टंचाईग्रस्त वाड्यांना व गावांना पिण्याच्या पाण्याची झळ पोहोचू नये , यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेतली असून टंचाईच्या परिस्थितीवर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत केले आहे . पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा प्रशासनाने तयार केला असला तरी यंदा पाणीटंचाईग्रस्त वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे . श्रीवर्धन तालुका टैंकरमुक्त करण्यासाठी तालुक्यातील अनेक अपूर्ण पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची गरज आहे . दिघी , बागमांडला , हरिहरेश्वर , मारळ , कुडगाव , दांडा येथील सावरवाडी , बोलपंचतनमधील मोरटाकी , नागळोली गावातील मधलीवाडी , कुड़गांव आदिवासीवाडी , मारळ टेपरी , बौद्धवाडी , साखरोने , भरडखोल , कोळीवाड़ा , भरडोली , सर्वे , शेखाडी कुणबीवाडी , खारगांव बौद्धवाडी , कुडकी बौद्धवाडी , कालें बौद्धवाडी , वेळासमधील बौद्धवाडी , वडघर , दिघी , वांजळे गवळीवाडी ( होळीचा कोंड ) , भावे कुणबीवाडी , कुडकी कुणबीवाडी , गालसुरे आदिवासीवाडी , सायगांव , हरेश्वर , धनगरमलई , गुलधे , अशा अनेक वाड्यांना मागील वर्षामध्ये टॅकरने पाणीपुरवठा केला गेला . मात्र , यावेळी एप्रिल अखेरीस गावांची संभाव्य संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे . दरवर्षीच्या दिघी गावातील तुलनेत यावर्षीदेखील टैंकरने पाणी पुरवण्यासाठी गावे व वाड्यांच्या संख्या काही कमी झाल्याचे दिसत नाही . दरवर्षीच्या परंपरेनुसार राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासनाच्या तत्परतेचा अभाव अशा क्षुल्लक कारणांमुळे श्रीवर्धन तालुका कायमस्वरुपी टंचाईमुक्त होण्याचे स्वप्न आजही अपूर्ण राहिले आहे .
गेल्या ५ ते १० वर्षांपासून उन्हाळ्यात टंचाई भासते . दिघी पोर्ट प्रशासन अखेरच्या महिन्यात तात्पुरती पाण्याची उपाय योजना करुन देण्यात धन्यता मानते . पाणीटंचाई समस्येमुळे ग्रामस्थांचा वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो . त्यामुळे मजुरी बुडते . त्यामुळे शासनाने कायमस्वरुपी पाणटंचाई दूर करण्याकरिता उपाययोजना करावी .
-बाळाराम हरी खेलोजी , कोळी समाज अध्यक्ष , दिघी
भविष्यातील पाणीटंचाई लक्षात ठेवून आम्ही जलसंधारण व जलसाठा वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत . आतापर्यंत टैंकर मागणी कोणत्याही ग्रामपंचायतीने केलेली नाही .
-प्रवीण सिणारे , गटविकास अधिकारी , श्रीवर्धन
दिघी गावातील पाणीटंचाई...
ग्रामस्थांच्या जनहित याचिकेवर निकाल देताना कोर्टाने २०११ साली दिघी पोर्टला त्वरित शंभर टॅकरने दिघी गावाला पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते . मात्र , सध्या पोर्टमार्फत कंत्राटदाराच्या सोयीनुसार ५० टॅकरने गावाला पाणीपुरवठा होत आहे , अशी माहिती दिघी ग्रामपंचायतीने दिली.
कोंढेपंचतन गवळीवाडीत भीषण पाणीटंचाई...
श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन येथील ग्रामस्थांना पाणी मिळत नाही . गेली पाच - सहा वर्षे टॅकरची मागणी करत आहेत . सध्या या गावात पाणीटंचाई आहे , ग्रामस्थ रानातील झ-यातून पाणी आणून पितात . गुरांना पाणीपुरवठा करण्यास अडचण येत , असे कोंढेपंचतन ग्रामस्थ अशोक दिवेकर यांनी बोलताना सांगितले.
फक्त विंधण विहिरी आणि टँकर . . .
शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार , औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याचा सामाजिक दायित्व निधी ( सीएसआर ) , कृषी विभागाच्या योजना राबविल्या जातात . मात्र फारसा फरक तालुक्यातील गावांना पडला नाही . तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात टॅकर पोचवण्याऐवजी ज संधारण तसेच जलसंवर्धनसारख्या कायम व दूरदृष्टी उपायांची गरज आहे . गेली पाच वर्षे प्रशासन बँकर व विंधन विहिरी प्रस्तावित करण्याचे कागद घोडे नाचवते . कधी कधी विंधन विहिरीस पाणी न लागल्याने खर्चही वाया जातो .


Post a Comment