राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भास्कर (दाजी)विचारे यांना अंडरवर्ल्डच्या धमक्या ; प्रचार न करण्यासाठी धमक्या


संजय खांबेटे :म्हसळा 
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील  राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून माजी खासदार संजय दिना पाटील रिंगणात आहेत त्यानी भाजपा समोर प्रचंड आव्हान उभे केले आहे. याच हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे  उपाध्यक्ष भास्कर (दाजी) विचारे यांना तुम्ही संजय पाटील यांचा प्रचार करू नका,घरीच गप्प बसा अशी धमकी अज्ञात इसमाने फोन वर दिल्याने विचारे यानी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भांडुप पोलीसानी भादवी ५०७ प्रमाणे घटनेची नोंद केली आहे. भास्कर विचारे हे मूळचे म्हसळा तालुक्यातील फळसप येथील आहेत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगड लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक आहेत.भास्कर विचारे यानी राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांचेसाठी फार मोठी कार्यकIर्त्यांची ताकद निर्माण केली शिवसेना-भाजप युतीच्या वादात या वेळी राष्ट्रवादी आघाडीच्या 'घड्याळा'ला टिकटिक होण्याचे संकेत मिळत आसल्याचे चित्र मतदार संघात आहे. त्यामुळे धमक्यांचे सत्र सुरू झाले असावे असे म्हटले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा