भुषण बरे यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार महादेव पाटील यांना कोणी दिला - अनिल काप


कुणबी समाज्जोन्नती संघाचे अध्यक्ष भुषण बरे यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार महादेव पाटील यांना कोणी दिला - अनिल काप

म्हसळा ( बाबू शिर्के)
चार पाच डोकी एकत्र येऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हसळा कुणबी तालुका अध्यक्ष आणी त्यांचा सहकार्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना तालुक्यातील संपूर्ण कुणबी समाजाचा पाठिंबा असल्याचा निर्णय घेतला परंतु हा  निर्णय कोणालाही विश्वासात न घेता घेतला गेला आहे .अशी माहिती कुणबी युवा अध्यक्ष अनिल काप यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितली. सुनील तटकरे यांना ठाम पाठिंबा दर्शविणारे तुम्ही कुणबी समाजाचे कोण  मोठे नेते आहात का ? असा प्रश्न विचारात लोकांना काहीही सांगून त्यांची दिशा भूल करू नका. तुम्हाला समाजाचे अध्यक्ष तालुक्यातील कुणबी समाज बांधवानी केले आहे तटकरे यांनी नाही याचे भान ठेवून वक्तव्य करा असा इशारा म्हसळा अध्यक्ष महादेव पाटील आणि श्रीपत धोकटे यांना पुढे बोलताना दिला. 
आमची मातृसंस्था असणारे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संस्थेचे आम्ही तालुक्यातील प्रत्येक गाव वाडीतील 3000 हजार सभासद आहोत,आणि 9 सभासद सात जिल्ह्याच्या कार्यकारणी मद्ये आहेत त्यामुळे आमच्या महाराष्ट्र मधील कुणबी समाजाची प्रमुख संघटना असणारी आमची मातृसंथा कुणबी समाजोन्नती संघ यांच्या आदेशाचे पालन करण प्रथम आमचे कर्तव्य आहे.आम्ही समाजाचे आदेश पाळतो  हे लक्षात ठेवा,कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांनी लोकसभा निवडणुकीमद्ये जे कुणबी उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आणी हा निर्णय भूषण बरे  यांचा एकट्याचा नाही हे लक्षात असावे,.या पुढे आपण कोणतीही शहानिशा न करता भूषण बरे यांच्यावर आरोप कराल आणि तालुक्यातील समाजबांधव यांना वेठीस  धराल तर तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ अशी धमकी काप यांनी पुढे बोलताना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा