( म्हसळा प्रतिनिधी )
सार्वजनिक वाचनालय म्हसळे येथे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व अन्य साहीत्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याचा वाचकानी लाभ घेतला. यावेळी प्रतिमेचे पूजन
अध्यक्ष संजय खांबेटे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ग्रंथपाल उदय करडे, धनश्री नाक्ती,सायली चौगुले, महादेव पाटील ,अनंत नाक्ती , विशाल पौळकर, सहदेव चव्हाण, सुजय कुसाळकर, सोनावणे व अन्य वाचक हितचिंतक हजर होते.

Post a Comment