● रायगड जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचे काम सुनिल तटकरे यांनीच केले आहे - माजी प्रतोद वैशाली सावंत
● सुनिल तटकरे साहेबांमुळेच महिला वेगवेगळ्या पदावर कार्यरत - तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
32 रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. रायगड- रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे रखरखत्या उन्हाचा पारा चढत आहे तर दुसरीकडे निवडणूक प्रचाराचा भडका उडत असल्याचे चित्र आहे. लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण मागील 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचा अवघ्या 2100 मतांनी पराभव होऊन शिवसेनेचे अनंत गीते यांचा विजय झाला होता. सुनिल तटकरे यांचा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागून राहिला आहे त्यामुळे आता काहीही करून या पराभवाचा वचपा काढला पाहिजे अशी खूणगाठ मनाशी बांधून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. याचेच प्रत्यय म्हसळा तालुक्यातील गाव, वाडी वस्तीवर, मोहल्ला, वार्डावार्डात फिरत असलेल्या आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे रायगड लोकसभा उमेदवार सुनिल तटकरे यांना यावेळी रायगडसह देशाचा विकास करण्याकामी लोकसभेत निवडुन आणण्यासाठी म्हसळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे महिला पदाधिकारी यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. खेडोपाडयात घरोघरी जाऊन महिलावर्ग प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेत सुनिल तटकरे यांच्या कार्याची महती विशद करित आहेत त्यांना आपल्या हक्काचा आणि विकास करणारे खासदार निवडुन आणण्यासाठी अथक परिश्रम घेत असताना दिसत आहेत.
"जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्दारी" हे महिलांबाबतीत वास्तवात जरी खरे असले तरी महिला वर्गाला पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात करिअर करण अवघड होते. डिजिटल दुनियेत आज परस्थिती बदललेली असल्याने महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांनी विधीमंडळात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 30% आरक्षण विधेयक मंजूर करण्यास मोलाची कामगिरी केली आहे त्यामुळे गेल्या 10 वर्षापासुन आम्हा महिलांना ग्रामीण भागात लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली म्हणुनच आज शहरात, नगरात महिला नगराध्यक्षा, नगरसेविका, विषय समित्यांच्या सभापती, जिल्हा परिषदेच्या सदस्या, अध्यक्षा, पंचायत समिती सभापती, सदस्या, ग्रामपंचायतिच्या सरपंच आदी पदांवर विराजमान होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शरदचंद्रजी पवार यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत असे मनोगत रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा पक्ष प्रतोद वैशाली सावंत यांनी गावबैठकांच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले. चुल आणि मुल सांभाळून संसारात वावरणाऱ्या आम्हा महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हसळा सारख्या ग्रामीण भागात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यामध्ये पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांचाही मोलाचा वाटा आहे. महिलांना लोकप्रतीनीधित्व देवुन सामान्य जनतेच्या सेवा सुविधा उपलब्ध करण्याचे भाग्य प्राप्त झाले असल्याचे वैशाली सावंत यांनी सांगितले. ग्रामीण भागात महिलांचे सक्षमीकरण, हाताला काम, रोजगार, गावाचा विकास, मुलांना उच्च शिक्षण, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, पर्यटन विकास, तरुण पिढीला उद्योग-व्यवसाय आदी सेवा सुविधा अधिकपणे उपलब्ध करण्यासाठी कार्यक्षम नेते सुनिल तटकरे यांना 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी निवडुन आणण्यासाठी आम्ही महिला गावोगावी, घरोघरी जाऊन प्रचार मोहीम यशस्वी करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रेश्मा काणसे यांनी सांगितले. प्रचार मोहिमेत महिला अध्यक्षा रेश्मा काणसे, नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक, माजी नगराध्यक्षा कविता बोरकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या धनश्री पाटील, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली सावंत, माजी जिप सदस्या हिराताई बसवत, विद्यमान सभापती छाया म्हात्रे, माजी सभापती उज्वला सावंत, माजी सभापती अनिता खडस, नगरसेविका जयश्री कापरे, नगरसेविका सेजल खताते, नगरसेविका शितल मांडवकर, नगरसेविका हुर्जुक, सरपंच वनिता खोत, सरपंच सोनल घोले, सरपंच प्रियांका निंबरे, सरपंच इशारत फकिह, ग्रामपंचायत सदस्या रमाबाई घोले, महिला शहर अध्यक्षा श्रीमती शगुप्ता, काँग्रेस महिला शहर अध्यक्षा आदी मान्यवर महिला प्रचार मोहीमेत सहभागी होऊन आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यत पोहचवून "अब की बार... तटकरे साहेबच खासदार अशा घोषणा देत आहेत.


Post a Comment