श्रीवर्धन : आनंद जोशी
रा . प . श्रीवर्धन आगाराकडून उन्हाळी हंगामाकरिता नियमित फेऱ्या व्यतिरिक्त खालीलप्रमाणे गाड्यांची ज्यादा वाहतूक करण्यात येणार आहे . ही वाहतूक १५ एप्रिल ते १५ जून २०१९ या कालावधीकरिता रहाणार आहे .
यामध्ये नानवेल - मुंबई ( सकाळी ५ वा . व रात्री ९ . ३० वा . येणारी , नालासोपारा ( सकाळी ९ . १५ , १२ . ३० व रात्री ९ . ३० ) , नालासोपारा - श्रीवर्धन ( रात्री १२ . ५ , स . ४ . ३० व रात्री ९ . ३० ) , श्रीवर्धन - पुणे ( सकाळी ७ . १५ ) पुणे श्रीवर्धन (दुपारी ४ . ००) , श्रीवर्धन - मुंबई ( सकाळी ३ . ३० व दुपारी २ . १५ ) , मुंबई - श्रीवर्धन ( दुपारी २ . ३० व दुपारी ४ . ०० ) या सर्व ज्यादा फे-या आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत . प्रवाशांना सदर फेऱ्यांचा लाभ घेता येईल . तसेच दि . २२ व २३ एप्रिल रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये आगारांतील ४८ गाड्या द्याव्या लागणार आहेत . त्यामुळे दि . २२ व २३ एप्रिल रोजी वाहतूक विस्कळीत होणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन आगारातर्फे करण्यात आले आहे .

Post a Comment