संजय खांबेटे : म्हसळा
आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस असून एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. भारतासह जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. हा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक स्वरूपाचा सण आहे. याच्या पूर्व संधेला म्हसळा तालुक्यातील सुर्यकांत तांबे , बी.एस्. मोरे, संतोष भिकू जाधव, अनिल रामजी जाधव , अंकीत शांताराम धोत्रे, सुरेश घोडू जाधव यानी सार्वजनिक वाचनालय म्हसळा या संस्थेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्रमाला खंड २२, राजश्री शाहू महाराज गौरव ग्रंथ, लोक शाहीर आण्णाभाऊ साठे , आकाश दर्शन अॅटलास, मराठी विज्ञान साहीत्याचा इतिहास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे हे राज्य शासनाने गौरवीलेले ग्रंथ भेट म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय खांबेटे यांचे कडे सुपुर्त केले.यावेळी ग्रंथपाल उदय करडे, लिपिक धनश्री नाक्ती, व 'एन्.के. जाधव, अनंत मोरे, राजेंद्र मोहीते हे मान्यवर उपस्थित होते.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी " शिका ,संघटीत व्हा, संघर्ष करा" या मुख्य विचाराने प्रेरीत होऊन , ग्रंथ भेट दिले.
-एन्.के. जाधव. कोंझरी.
सुसंस्कृत नागरिक घडवायचा असेल तर नुसती साक्षरता असून चालणार नाही.वाचल पाहीजे, विचार केला पाहीजे, वाचनाची गोडी लहानपणीच लावायला पाहीजे. लहान मुलांसमोर सतत पुस्तके पाहीजेत.-बी.एस्. मोरे.पाभरे,

Post a Comment