म्हसळा तालुक्यात निवडणूक पुर्व पोलिसांची मोठी कारवाई : अनेक गावठी दारुच्या भट्टी उत्पादनाचे केंद्र केले उध्वस्त : तर २०२ जणांवर केली प्रतिबंधांत्मक कारवाई :
म्हसळा ( निकेश कोकचा )
संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रायगड -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात सध्या निवडणूकांचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच पोलिसांनी केलेल्या कारवाईचे संपुर्ण तालुक्यातून कौतूक होत आहे.तालुक्यात निवडणूकी पुर्व प्रथमच एवढी मोठी कारवाई केल्याचे समजते.
रायगड - रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून सहा वेळा खासदार राहिलेले शिवसेना नेते अनंत गिते यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी प्रयेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचिटणिस सुनिल तटकरे यांच्या मध्ये सरळ लढत आहे. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील राज्यातील अतिशय महत्वाच्या या लढती मध्ये कोणतीही विपरित घटना घडू नये म्हणून रायगड पोलिस अति दक्ष दिसत आहे. रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत येणाऱ्या म्हसळा पोलिस ठाणे क्षेत्रात सहा. पोलिस निरिक्षक प्रविण कोल्हे यांनी निवडणूक संदर्भात खबरदारी बाळगता अवैध्यरित्या चालणाऱ्या हातभट्टी पासून दारू निर्मिती व विक्री केंद्रावर रविवार दि. ७ एप्रिल रोजी अचानक पणे धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये गावठी दारुच्या उत्पादकांना अटक केली आहे. तसेच तालुक्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे व गुन्हे दाखल असलेल्या २०२ जणांवर सि.आर.पीसी.११०, सि.आर.पी.सी. १०७, बि.पी. ९३, सि.आर.पिसी. १४९, बि.पी. ५७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. म्हसळा तालुक्यात प्रथमच पोलिसांमार्फत एवढी मोठी कारवाई करण्यात आल्याने, निवडणूक काळांत गुन्हेगारी प्रवृत्तीला नक्कीच आळा बसनार असल्याने पोलिस ठाण्याचे सहा.पो.निरिक्षक प्रविण कोल्हे यांच्या या कारवाईचे सर्व क्षेत्रातून कौतूक होत आहे. स्वप्नाली पवार म.पो.ना. /१८८ याच्या फिर्यादी वरून आरोपी गौरी काशीनाथ वाघे, रा. चिखलप आदीवासीवाडी या महिलेला हातभट्टी दारु विनापरवाणा तयार करणे व बाळगणे या प्रकरणी अटक केली आहे.

Post a Comment