Digital India साठी म्हसळे कर अजूनही आऊट ऑफ रेंज...



बी.एस्.एन्.एल्.सह अन्य कंपन्यांचे नेटवर्क कनेक्टीहीटी नसल्याने म्हसळाकर होत आहेत हैराण ; निवडणूक आयोगाचे अॅप सुध्दा तासन तास उघडत नाहीत : म्हसळे तालुक्यातील शासकीय कामकाज चाले नेट च्या तालावर

संजय खांबेटे : म्हसळा

   शासनाने बहुतांश गोष्टी पारदर्शक होण्याच्या दृष्टीने नागरिकाना ऑनलाईन सुविधेचा वापर करण्यावर भर दिला असतानाच बी.एस्.एन्.एल्.सह , जिओ,आयडीया, व्होडाफोन, अेअरटेल, डोकोमो यासर्वच कंपन्याचे नेटवर्क सुविधा ढासळल्याने नागरीकांची व शासनाच्या सेवेत प्रचंड खोळंबा होत असतो. सर्व शासकीय कार्यालयांतून बी.एस्.एन्.एल्.ब्रॉड बॅंड सुविधेची यंत्रणा असून त्याना अनेक वेळा  नेटवर्क नसल्याने बहुतांश आधिकारी आपल्या खर्चाने खाजगी मोडेम वापरतात . पोलीस स्टेशनचे FIR , स्टेशन डायरी, C.C.T.N.S. आवक जावक हा महत्त्वाचा वापरं, महसुलची P. M. किसान, डाटा एंट्री, चलन काढणे, ७/१२, ८ अ, फेरफार, वारस नोंद, तशाच पध्दतीने पोस्ट, कृषी, आरोग्य, जिल्हा परिषद सेवा देत असतात नेट कनेक्टी व्हिटी निरंतर असावी या साठी महसुल विभागासह कोणतीही शासकीय यंत्रणा तक्रार का करीत नाही हा म्हसळा करांचा चर्चेचा विषय आहे.
  " निवडणूक आयोगाने प्रथमच मतदारांच्या सोयी साठी विविध मोबाईल अॅप तयार केली आहेत. सी- व्हिजिल , व्होटर्स हेल्पलाईन ,पी. डब्ल्यूडी ही अॅव प्रॉपर कनेक्टी व्हिटी नसल्याने सतत बंद असतात यामुळे " निवडणूक आयोगा"य्या  सेवा आहेत पण त्या म्हसळ्यात बीन कामाच्या अशी स्थिती आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा