ग्लोबल कोकण साठी ५० गावांची निवड ; पर्यटन वाढीसाठी होणार मदत...


टीम म्हसळा लाईव्ह

कोकणातील पर्यटन विकासाला बळकटी येण्यासाठी आणि कोकणातील पर्यटनाला जागतिक दर्जा देण्यासाठी रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 गावांतून आंतराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या योजनुसार नेट कनेक्टिव्हिच्या अद्ययावत सुविधांसह रस्ते विकास, हवाई मार्गासह जलमार्गाचीही उपलब्धता करून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग येथे चिपी विमानतळ पूर्ण झाल्यानंतर आता रत्नागिरीतही तटरक्षक दलांच्या विमनतळावरून हवाई प्रवासाच्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती येथील महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या (एमटीडीसी) सूत्रांनी दिली.

कोकणात निसर्ग संपदेने नटलेला समृद्ध किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, शिवकालीन दुर्ग, नारळ, आंबा, काजू मत्स्यसंपदा या वैविध्यतेमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणाकडे आकर्षित होत असतात. मात्र, पर्यटन वाढीच्या दृष्टीने लागणार्‍या अत्यावश्यक सेवा व सुविधा नसल्याने परदेशी चलन मिऴवून देण्याची क्षमता असतानाही कोकण दुर्लक्षित राहिले आहे. निसर्ग संपदेने नटलेल्या कोकणातील पर्यटनाला मोठा वाव असून त्या माध्यमातून पर्यटन विकास साधण्याच्या दृष्टीने पर्यटनाच्या नकाशावर कोकण जागतिक दर्जा मिळवून देण्याची तयारी ग्लोबलायझेन टूरिझममध्ये करण्यात आली आहे.

कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभागाने विशेष प्रयत्न चालविले असून 'एअर बीएनबी' या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर कोकणात आंतराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यातयेणार आहेत. या योजनेत रायगडमधील 17 रत्नागिरीतील 13 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 20 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 

कोकणच्या पर्यटनवाढीसाठी एअर बीएनबी या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील समुद्रकिनार्‍यावरील गावागावात 2000 पर्यटन केंद्रे जागतिक दर्जाच्या निकषाप्रमाणे तयार करण्यात येणार आहेत. या सुविधा निवडण्यात आलेल्या गावात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा