तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरला भाविकांची गर्दी ; महाराष्ट्रातून भाविक हरेश्वर ला दाखल : शिव मंदिरात भाविकांनी मांदियाळी



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 
 दक्षिण काशी असलेले महाराष्ट्रातील नावाजलेले तीर्थक्षेत्र     हरिहरेश्वरला  शिवरात्री निमित्र दर्शनांसाठी महाराष्ट्रातील भाविकांनी  अलोट गर्दी केली आहे .  तीर्थक्षेत्र  हरिहरेश्वरची महंती पुराण व उपनिषदांत आढळते . शिवरात्री चा दिवस सर्व शिव भक्तांसाठी श्रद्धेचा व समर्पित भावनेचा असतो .शिवभक्तांनी मोठया श्रद्धेने हरिहरेश्वर मंदिरात दिवस भर पूजाअर्चा केली .अभिषेकास पहाटे पासून प्रारंभ झाला .

रायगड जिल्ह्यातील  हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे मंदिर आहे.  हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाची आहेत. यामुळे शिवरात्र व  श्रावणात येथे मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांची दर्शनासाठी   गर्दी असते. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्र तीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे येथे आहेत.   हरिहरेश्वराचे मंदिर प्राचीन पांडव कालीनअसावे असा अंदाज आहे. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सन १७२३ मध्ये केल्याचे समजते . डोंगराच्या कुशीत हरिहरेश्वर हे तीर्थस्थान आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत, त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील सुमारे दीडशे    पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर सुमारे सव्वा किमी आहे . .महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक व पर्यटक हरिहरेश्वर ला येतात .तीर्थक्षेत्रा सोबत हरेश्वर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे.

तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर मध्ये  येणाऱ्या भाविकांच्या  भौतिक    सोईसुविधाची तरतूद करणे आवश्यक आहे .पांडव प्रदक्षिणा मार्गा  विषयी योग्य मार्गदर्शन फलकांची गरज आहे .हरिहरेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकी साठी एस टी महामंडळाच्या दिवसात चार ते पाच फेऱ्या हरिहरेश्वर ला जातात .त्या व्यतिरिक्त खाजगी विक्रम मिनिडोअर सदैव चालू असतात .

श्रीवर्धन तालुक्यातील जीवनेश्वर मंदिर, जावेळे चे शँकर मंदिर ,वेळासचे शँकर मंदिर, नानवेलचे भैरवनाथ मंदिर ,सर्वा गावातील  सर्वेश्वर मंदिर येथे भाविकांनी सकाळ पासून दर्शनासाठी गर्दी केली .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा