श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
श्रीवर्धन शहरातील होळी सणाला फार मोठी परंपरा आहे. गावातील विविध नाक्यावर प्रत्येक पाखाडी मार्फत होळी साजरी केली जाते. अमंगळ ,अशुद्धी याचे पतन करण्यासाठी होळी सण साजरा केला जातो. गावातील प्रत्येक पाखडीतील नागरिक होळीसाठी जाळण सोमजाई मंदिराच्या परिसरात सकाळ पासून संध्याकाळ पर्यन्त आणून ठेवतात . शहरातील भैरवनाथ मंदिर ,सोमजाई मंदिर व शंकर मंदिर या भागात मोठया संख्येने श्रीवर्धन मधील नागरिक जमा होतात .पारंपरिक पद्धतीने वाद्य व ढोलाच्या नादमय आवाजात विधिवत होळी ची पूजा अर्चा केली जाते .सोमजाई मंदिराच्या आवारात जवळपास 25 फुटांची होळी पेटवली जाते .शहरातील सर्व जाती धर्माचे लोक होळीच्या दर्शनासाठी हजर असतात .पेटत्या होळीतून नारळ काढण्यासाठी तरुण वर्ग प्रयत्नशील असतो .त्याच सोबत उपस्थित लहान मुले व तरुण पारंपरिक पद्धतीने बोब ठोकत वातावरणात जोश निर्माण करतात .होळी चा सण श्रीवर्धन तालुक्यात जवळपास पंधरा दिवस मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने साजरा केला जातो .
कुसुमादेवी, काळेश्वरी व सोमजाई या तिन्ही काळभैरवाच्या बहिणी आहेत अशी आख्यायिका श्रीवर्धन मध्ये प्रचलित आहे. ग्रामदेवता सोमजाई असल्याने सर्वात जास्त लोक मंदिर परिसरात होळीच्या दर्शनास येतात .
शिमगोत्सवा निमित्त श्रीवर्धन मध्ये भैरीभवानी काळभैरव यांच्या खेळाला प्रारंभ झाला होता
प्रतिवर्षी प्रमाणे यंदा देखील पहिल्या होळी पासून श्री काळभैरवनाथाच्या खेळला सुरवात करण्यात आली आहे. वर्षातून एकदा शिमगोत्सवाच्या निमित्ताने खेळाच्या माध्यमातून भैरीभवानी आपल्या घरी येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरोघरी खेळाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात होते . यावेळी घरात असलेल्या समस्या दुर करून घरातील अडलेली काम पूर्ण करण्यासाठी देवापाशी नवस बोलले जातात. व पूर्ण झालेले नवस पुढल्या वर्षी खेळ आल्यावर फेडण्यात येतात. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून श्री काळभैरवाची ख्याती आहे. या खेळामध्ये एक विशिष्ट पद्धतीने मृदुंग वाजवून हंडेरी उंदेरी मुंबई जीवा खंदेरीला वेताळ बावा देवाचे दर्शन घेव गा राघो सर्वांनी दर्शन घ्यावे., नवस केला साखर मेवा मुंबा देवीला मिठाई मेवा या आशयाचे गाणं बोलली जातं होती . या गाण्याच्या तालावर लहान मूल टिपऱ्या नृत्य करताना दिसली . श्रीवर्धनमध्ये दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे. मात्र शहरातील उत्सवांच्या परंपरा मात्र अगदी उत्तमरित्या जोपासल्या जाताना दिसतात.

Post a Comment