रायगड सेना भाजपा युतीमध्ये पहिली ठिणगी ; उरण विधानसभा मतदारसंघासह मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने दिनांक २२ फेब्रुवारी, २०१९ रोजी भाजपा जिल्हा बैठक  झाराप, पाली येथे मा. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली या मध्ये रायगड लोकसभा शिवसेना पक्षाला दिली तर रायगड मधील उरण, पेण व श्रीवर्धन  विधानसभा भाजपा ला द्यावी असा ठराव सर्वानुमते घेणयात आला. प्रसंगी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक आणि भाजप अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा