म्हसळ्यात दि.23 व 24 फेब्रुवारी रोजी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम कार्यक्रम



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
    
       भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेऊन ज्यांची अजून मतदार नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदान नोंदणीसाठी आणखीन संधी मिळावी म्हणून व्होटर व्हेरिफिकेशन आणि जनजागृती कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम आयोजित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांनुसार म्हसळा तालुक्यातील 70 मतदान केंद्रांवर दि.23 व 24 फेब्रुवारी 2019 रोजी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, नावात दुरुस्ती करणे यासाठी नमुना नं.6, नमुना नं.7, नमुना नं.8 अशा प्रकारचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. याकामी स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या सर्वांनी त्या दिवशी उपस्थित राहणे सक्तीचे आहे व या विषेश मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन तहसील कार्यालय म्हसळा यांचेकडून करण्यात आले आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा