टीम म्हसळा लाईव्ह
देशभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. आघाडीची जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. युतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. युती आघाडी होईल तेव्हा होईल पण प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेत. वेगवेळ्या मार्गाने त्यांनी प्रचारासाठी सुरुवात केलीय. सोशल मीडियावर ही राजकिय शीतयुद्ध पाहायला मिळतं. आणि याच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या तरुणांकडून म्हसळा Live ने जाणून घेतले त्यांचं मत. रायगड लोकसभेसाठी आपली पसंती कोणाला हे फेसबुक च्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या पंधरा दिवसांत बातमी लिहिपर्यंत 2800 लोकांनी आपल्या पसंतीच्या लोकप्रतिनिधी ला निवडलं आहे. ही लोकसभा मोठ्या चुरशीची होईल असच आमच्या या पोल वरून दिसून येतं. 2800 पैकी समसमान मत दोघांनाही पडली आहेत. 1400 केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अनंत गीते यांना तर 1400 राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना. आता प्रत्यक्षात रायगड मध्ये कोण बाजी मारत हे पाहणं औत्सुक्याचे आहे.
हा पोल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत तो 52000 लोकांपर्यंत पोहोचला आहे. तर 12000 लोक या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. यामध्ये 900 लाईक्स आणि 900 हुन अधिक प्रतिक्रियांचा समावेश आहे.
हा पोल अजून पंधरा दिवस चालणार आहे. आपण आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केलं नसेल तर खाली दिलेली लिंक ओपन करा आणि आजच vote करा...
आपले खासदार कोण...? कोणाच्या बाजूने असेल जनमत..?
रायगड लोकसभा निवडणुक २०१९....
मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते की आघाडीचे सुनील तटकरे...?
आपली पसंती कोणाला...? आपण आपलं मत नक्की नोंदवा...
#raigad #loksabha #elections2019 #prepoll #survey
#रायगड #लोकसभा #निवडणूक #२०१९ #जनमत #MhaslaLive
Facebook www.facebook.com/livemhasla
Facebook www.facebook.com/livemhasla

Post a Comment